.
.
.

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी साकारला संतांचा पालखी सोहळा


दिंडी सोहळ्यातून चिमुकल्यांनी साधू संतांचा वेष परिधान करून दिला पर्यावरण संदेश
पंढरपूर  महाराष्ट्रच्या संपूर्ण कानकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त मोठया श्रद्धेने दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या  तीर्थ क्षेत्र पंढरपूर मध्ये येत असतात. हा वैष्णवांचा मेळा खूप मोठा असतो. या वारी मध्ये सर्व साधूसंतांच्या पालख्या येत असतात. या वारीचे प्रात्यक्षिक कोर्टी (ता.पंढरपूर )येथील सिंहगड पब्लिक स्कूल मधील लहानश्या चिमुकल्यांनी दिंडी सोहळ्यातून चिमुकल्यांनी  साधू संतांचा वेष परिधान करून पर्यावरण संदेश दिला.


सिंहगड पब्लिक स्कूल मधील पूर्व प्राथमिक लहान विद्यार्थ्यानी विविध संताचे गणवेश परिधान करून दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता . या दिंडी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावता माळी महाराज , संत गोरोबा काका, संत जनाबाई , संत मुक्तबाई आदि संतांच्या पोषाखात लहान विद्यार्थी होते. या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या लहान मुलींनी डोक्यावर तुळस घेतलेली होती. अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात टाळ, वीणा , हातात भगवा पताका घेवून मुखात माऊली हे नाम होते. या दिंडी सोहळ्यात काही मुलांनी पर्यावरण संरक्षणचा संदेश दिला. या चिमुकल्यांचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
दिंडी सोहळ्यात सहभागी विद्यार्थ्यांचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडे,  स्कूलच्या प्राचार्या सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर सह अनेक शिक्षक व शिक्षेकेतर कर्माच्यार्‍यांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले.











-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget