.
.
.

मराठा समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी शरद प्रतिष्ठाणचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ... नक्कीच दखल घेवू ! मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुतकेच आषाढी महापुजेसाठी आले असता शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.हे निवेदन स्विकारल्यानंतर आपल्या मागण्यांची नक्कीच दखल घेवू  असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहीती शरद किे्रडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे जिल्हयाध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.
        

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्यावतीने पंढरीत वसतीगृह उभारण्यात यावे,आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातुन सादर केलेली कर्जप्रकरणे बँकाकडून नाकारली जात असून अशा बँकावर कारवाई करावी.छत्रपती शाहू महाराज अध्यसन संस्थेच्या अधिनस्त पंढरपूरात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे.मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावीत.मराठा समाजातील  युवकांसाठी सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करावे आदी मागण्या मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
    हे निवेदन देताना सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,विकास घोलप आदी उपस्थित होते.   

















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget