कीर्तनात रंगला हरित वारीचा गजर... वारकऱ्यांना स्वेरीचे विद्यार्थी पटवून देत आहेत वृक्षांचे महत्व


पंढरपूर- पंढरपूरात आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांचा मेळा भरला असून त्यामध्ये स्वेरीचे विद्यार्थी समाजसेवा करत असतानाच वृक्ष वाचवा, स्वच्छता, पाणी बचाव, आदी महत्वाच्या विषयांवर समाज प्रबोधन करत आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा निर्मल वारी, हरित वारी या प्रकल्पामध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर सहभागी होत असताना आषाढी वारी २०१९ हरित वारी निर्माण करण्यासाठी स्वेरीचे विद्यार्थी वारकरी व नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. याचेच सर्वत्र कौतुक होत आहे.




        स्वेरीचे संस्थापक सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  आषाढी वारीमध्ये येणाऱ्या लहान मोठ्या दिंड्यांना ‘स्वेरीचे झाड’ देऊन त्या वारकऱ्यांना हरित प्रकल्पाचे महत्त्व सांगून वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे पटवून दिले. यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड तरी वर्षाकाठी लावले पाहिजे आणि ते वाढविले पाहिजे. असे देखील आवाहन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वतीने करण्यात येत आहे या उपक्रमाला वारीतील वारकरी प्रचंड प्रतिसाद देत आहेत. 

मठ, मंदीराजवळ आदी विविध ठिकाणी अभंग, कीर्तन कार्यक्रमात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष जावून वृक्षांचे महत्व पटवून देत आहेत. तसेच व्यसन मुक्ती, स्वच्छतेचे महत्व, पाण्याचा योग्य वापर, असे अनेक समाजोपयोगी विषयांवर प्रबोधन करत स्वेरीचे विद्यार्थी वारकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. असे दिसत आहे. यावेळी सायंकाळ पर्यंत पाचशे रोपे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले असून यामध्ये करंज, लिंब,चिंच, वड, पिंपळ असे विविध प्रकारच्या रोपांचा समावेश आहे. यावेळी स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत ग्रीन टीमचे समन्वयक प्रा.कुलदीप पुकाळे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉ रंगनाथ हरिदास, प्रा. यशपाल खेडकर व विद्यार्थी उपस्थित होते









-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget