.
.
.

लोटस इंग्लिश स्कूलला नॅशनल स्कूल अवॉर्ड घोषित ४ ऑगष्ट रोजी दिल्लीत होणार पुरस्कार वितरण


पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल ‘नॅशनल स्कूल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले असून येत्या ४ ऑगष्ट रोजी दिल्लीमध्ये समारंभ पूर्वक पुरुस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.  
       ‘मॅन मेकिंग एज्युकेशन’ अर्थात माणूस घडविते ते शिक्षण या स्वामी विवेकानंद यांच्या उक्तीप्रमाणे सन२०१० साली स्थापन झालेली लोट्स इंग्लिश स्कूल नावाची शाळा अवघ्या ९ वर्षातच उंच भरारी घेऊन राज्यात आपले नाव उंचावले आहे.


सुरवातीला दोन खोल्यांमध्ये सुरू झालेली ही शाळा पुढे कासेगाव सारख्या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी करू शकते.  यावर कोणाचा विस्व्सास बसणार नाही. परंतु ते शक्य केलेय सांघिक निर्णय व उपक्रमाच्या जोरावर. या ठिकाणी एक हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानग्रहण करीत आहेत. कष्ट आणि अभ्यास करण्याची चिकाटी असेल तर यश नक्की मिळते. म्हणूनच दरवर्षी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी विविध स्पर्धेत चमकत असतात. ’नॅशनल स्कूल अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी भारतातून ९८७ शाळा निवड करण्यात आल्या होत्या.हा पुरस्कार बहाल करणारी संस्था मोहाली (पंजाब) येथील आहे. हा पुरस्कार अशा शाळांना दिला जातो की, ज्या समाजामध्ये शिक्षण प्रक्रियांमध्ये विविध बदल घडवून परिवर्तन घडवून आणतात. शिक्षण प्रक्रियेमधील समाजातील त्रुटी काढण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. अशा उपक्रमशील शाळांना ओळखून त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ज्या शाळा उत्कृष्ट उपक्रम राबवितात आणि आपली शैक्षणिक गुणवत्ता उंचवतात. आजच्या युगात नवीन तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षकांची प्रगती घडवणाऱ्या संस्थेची निवड करून अशा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. 

लोटस इंग्लिश स्कूल ला पुरस्कार देण्याचे प्रमुख मुद्दे म्हणजे नेहा डुबल ही जी.के. ओलंपियाड स्पर्धेत भारतात दुसरी, केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस तर्फे पंडित दीनदयाळ स्पर्श योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातून सतरा हजार विद्यार्थ्यातून आदित्य अभिजीत बेणारे आणि सार्थक सुनील रणदिवे या दोन विद्यार्थ्यांची निवड,

 अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करणे (रेमेडियल क्लासेस), जपानच्या टोकियो मधील यारोकी कंपनीसोबत गणितीय करार करून त्याद्वारे गणिताचे शिक्षण देऊन त्याद्वारे गणित सोप्या भाषेत शिकविणेभाषा प्रयोग शाळाद्वारे भाषेचे उत्तम ज्ञान देणे, उत्कृष्ट प्रयोगशाळा, संगणक कक्षसी.सी टी.व्ही कॅमेराद्वारे शाळेवर व विद्यार्थ्यांवर नियंत्रणसुसज्ज ग्रंथालय, दरवर्षी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम राबविणेशैक्षणिक सहल राबविणेफिल्डवर्क राबविणे, लोकशाहीमधील पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी पोलिस स्टेशनला भेट देणेपोस्टातील कामकाज कसे चालते हे समजून घेण्यासाठी पोस्ट कार्यालयाला भेट देणेगाडी चालविताना हेल्मेटचा वापर करून अपघात टाळण्यासाठी समाज प्रबोधन करणे, अनाथ मुलाला अन्नदान करणे, वृक्षारोपण करणे, पाणी वाचवा अभियान, मतदान जनजागृती,जिल्हा सत्र न्यायालय तर्फे कायदेविषयक शिबीर,केंद्र सरकारचे गोवर रूबेला अभियान, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम मुलींसाठी (सेल्फ डिफेन्स) स्वरक्षणासाठी  जुडो, कराटेबॉक्सिंग, इ. प्रशिक्षण देणे, विविध मैदानी क्रीडा राबविणेविज्ञान प्रदर्शन राबविणेविविध महापुरुषांच्या जयंत्या व सण साजरे करणे सहदोय कॉम्प्लेक्स सोलापूरद्वारे इंटर स्कूल कॉम्पिटिशन इनडोर आउट डोअर गेम राबविणे, तसेच अनेक उपक्रम राबविणे याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण पुढे म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापन माडल व पदाधिकारी ,शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी या सर्वांच्या योगदानामुळे हा पुरस्कार घोषित झाला.
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget