.
.
.

अल्पदरात राहण्याची उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच सामााजिक बांधिलकी जपणारे श्रीसंत तनपुरे महाराज चारोधाम मंडप


अनेक आव्हानांना तोंड देत पंढरीतील काही मठामधून वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. अल्पदरात राहण्याची उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे असे पंढरीतील श्रीसंत चारोधाम मंडप ट्रस्ट येथे ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या कल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले व सामाजिक कार्याची हि परंपरा आजतागायत अखंडितपणे चालू आहे.

तनपुरे महाराज मठामध्ये रोज सकाळी 5 ते 7 काकडा असतो. दुपारी 12 ते 3 भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, त्याचवेळी सदावर्त त्यातून अंध, पंगू व वृद्धांना अन्नदान, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, तसेच रात्री 9 ते 11 कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम मठातर्फे राबविले जातात. संपूर्ण दिवसभर सुरु असलेल्या निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमातून सांप्रदायिक म्हणून आलेल्या भाविकांच्या मनाची मशागत केली जाते. आज मठाच्या गादीवर असलेले बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी हाच वसा कायम ठेवून भौतिक प्रगतीमुळे अध्यात्मापासून दूर चाललेल्या लोकांना रसाळ प्रवचनातून अध्यात्माकडे खेचण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

 ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे महाराज यांचा खुप मोठा शिष्य वर्ग महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा, रत्नागिरी व विदर्भ येथे आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे दैनंदिन जीवनात वारकरी म्हणून आपले आचारविचार पाळतात. तनपुरे महाराज मठ व्यवस्थापनांना पुढचं पाऊल शिक्षण क्षेत्रात टाकले असून संस्थेने नागरजिल्यात खांडगाव येथे हायस्कुल व गुरुकुल पद्धतीची शिक्षण साथ सुरु केली आहे. भाविकांना सोयी सुविधा देऊन परमार्थातून  समाजसेवेचा आनंद लुटणारा संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट ही एक आनंदयात्री संस्था आहे.

पंढरीतील विठ्ठल मंदिर ते रेल्वे स्थानक या प्रमुख रस्त्यावर संत तनपुरे महाराज ट्रस्टच्या वतीने चारोधाम मंडप उभारण्यात आला आहे. गुराखी अवस्थेतून आपल्या जीवनाची सुरवात करून संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने चारोधाम पदयात्रा केल्यानंतर, 1943 साली अखंड चालणार्‍या अन्नदान सदावर्ताची सुरवात केली. तनपुरे महाराजांनी साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन अस्पृश्याना पांडुरंगाच्या पायाचे दर्शन मिळवून दिले. 1949 चा हैद्राबाद ऍक्शन संपेपर्यंत हजारो कुटूंबे पंढरपूरला आणून पालनपोषण केले. 
   
1952 साली मोठा दुष्काळ पडला. 21 दुष्काळी केंद्रांपैकी जळगाव या मदत केंद्रावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भेट दिली.  तनपुरे बाबांच्या या कार्याचे कौतुक केले. 1958 साली विनोबा भावे मांनी पंढरपुरात सर्वोदय संमेलन भरविले. त्मावेळी हे संमेलन चारोधाम मंडपात झाले. 1962 साली चीन आक्रमणाच्या वेळी परचक्र दूर होऊन विश्वशांती शांती यज्ञ करण्याचा मनोदय व्यक्त केला. 
1965 साली कै. कमळापती त्रिपाठी, बी. डी. जत्ती, कै. यशवंतराव चव्हाण आदींच्या समवेत विश्वशांती  यज्ञ केला. 1968 साली कोयनेच्या भूकंपग्रस्तांना व 1972 सालच्या महाराष्ट्रातील पडलेल्या दुष्काळाच्या गुरांसाठी छावण्या उघडल्या होत्या.

हिमालयात उत्तरेस धर्मशाळा कडून उत्तरेस संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.

संत तनपुरे महाराजांनी 21 हजार मैलाच्या 3 वेळा पायी भारत प्रवासात सामाजिक, धार्मिक संक्रमण केले. या प्रवासात बारा जोतिर्लिंगाच्या मूर्ती आणल्या. 1957 साली विश्वशांती यज्ञ करून त्या मूर्तीची स्थापना केली. 1985 साली तनपुरे बाबाचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ह.भ.प. बद्रीनाथ महाराज यांनी त्यांचे कार्य समर्थपणे पेलले आहे. त्यांनी संस्थेच्या कार्य वाढीस लावले. त्यांनी संत वाड्मय प्रसार. संत संस्कार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले. संत तुकारामाची गाथा अल्प किंमतीत प्रसिद्ध करून वितरित केले. त्यांनी परमार्थ महाधन है त्रैमासिक सुरु केले. 19 जानेवारी 1996 साली बद्रीनाथ महाराजांनी मातोश्री वृद्धाश्रमाची सुरवात केली. एका वर्षाच्या आत गोपालपूरच्या रम्य भूमीत मातोश्री वृद्धाश्रम सुरु करून 100 वृद्धाची सोया केली. भविष्यामध्ये त्यांच्या जोडीला बालग्राम व गुरुकुल  उघडण्यात येणार आहे.
संत तनपुरे चारोधाम मंडपातील इमारत भव्य वास्तू असून. या ठिकाणी 150 खोल्या आहेत. दोन भव्य मंडप यामुळे या ठिकाणी 25 हजार भाविक उतरतात. तसेच या ठिकाणी भजन, कीर्तन व प्रवचन आदी कार्यक्रम नियमित सुरु असतात. संत तनपुरे मठाच्या मागे असलेल्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमुळे  हा मठ भाविकांच्या दृष्टीने आदराचे स्थान बनला आहे.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget