.
.
.

इस्कॉन घाटावर आंघोळ करताना पाण्यात बुडून अज्ञात महिलेचा मृत्यु... इस्कॉन घाटावर आंघोळीसाठी नदीपात्रात उतरणे धोकादायक!




चंद्रभागेच्या पैलतीरावर इस्कॉनने 15 कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या ‘हायटेक’ घाटावरुन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरणे धोकादायक आहे. ही बाब एका दुर्घटनेत महिलेचा बुडून मृत्यु झाल्यामुळे अधोरेखीत झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दि.12-07-19 रोजी सकाळी 07-00 वा.पूर्वी इस्कॉन घाट येथे एक अनोळखी महिला आंघोळीसाठी गेली असता तिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडुन मयत झाली. 

सदर महिलेचे अंदाजे वय -60 ते 65 वर्ष असुन रंग सावळा आहे. दोन्ही हाताचे पोटरीवर गोंदण,व डाव्या  हाताचे मनगटावर गोंदण, कानात पिवळया धातुची कर्ण फुले, गळयात काळया मण्याचा पोत व भगवे मणी असलेली माळा व तुलसी माळ, पायात जोडवी आहेत. सदर महिलेली ओळख अद्याप पटलेली नसुन पोलीस यासंदर्भात कसुन चौकशी करत आहेत.
               सदर मयत स्त्री बद्दल कोणाला काही एक माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन तालुका पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

पंढरपूर तालुका पो.ठाणे 02186223559
पोलिस नाईक भोसले-8888804057 

कशामुळे इस्कॉन घाटावर आंघोळीसाठी नदीपात्रात उतरणे धोकादायक आहे?

जिथे घाटाला चिटकुनच होड्या पाण्यावर तरंगतात तिथे पात्राची खोली किती असेल? मुळात चंद्रभागेच्या पैलतीरावरील नदीपात्र हे खोल आहे. तिथे इस्कॉनने घाट बांधलाय. या घाटावरील पायर्‍यावर बसुन तांब्याने पाणी अंगावर घेऊन स्नान करणे योग्य आहे. परंतु नदीच्या पात्रात उतरुन स्नान करणे मात्र निश्‍चितच धोक्याचे आहे. 
या घाटावर इस्कॉनने यासंदर्भात सुचना फलक बसवणे आवश्यक आहे. तसेच आपले सुरक्षा रक्षक नेमणे सुध्दा अत्यावश्यक आहे. या ठिकाणी नदीपात्रात बुडून अशाप्रकारे भाविकांचा मृत्यु होत असेल तर याला जबाबदार नेमके कोण? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. 















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget