.
.
.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर नगरपरिषद आरोग्य विभागाचे यात्रेकरुंना व भाविकांना नम्र आवाहन1) यात्रेकरु, दिंडीकरी, फडकरी, भाविकभक्त इ. यांची सोय नविन पुलाशेजारी सोलापूर रोडलगतच्या भक्ती सागर 65 एकर या जागेमध्ये केलेली आहे.
2) उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयाचा वापर करावा.
3) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.  4) सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणाबाबत ठिकठिकाणी माहिती ङ्गलक लावण्यात आलेले आहेत.  
5) शौचालयामध्ये कचरा व बाटल्या टाकु नयेत जेणेकरुन शौचालय स्वच्छतेस अडथळा येणार नाही.
6) उघड्यावर व नदी पात्रात शौचास बसलेले आढळून आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 110/117 व 115 अन्वये 
    प्रतीबंधात्मक कारवाई केली जाईल.
7) यात्रा कालावधीत वास्तव्यास असणारे यात्रेकरुंना त्या जागेतील शौचालय वापरण्यास उपलब्ध करुन द्यावेत. मठ, 
    धर्मशाळा धारकांनी व यजमान कृत्य करणार्‍यांनी 40 व्यक्तीसाठी 1 शौचालय सीट याप्रमाणे आपल्या जागेत शौचालय उपलब्ध करुन घ्यावेत.
8) पत्रावळी व द्रोणचा वापर:- जेवणाकरीता थर्माकोल, प्लास्टीकच्या पत्रावळी वापरु नये त्याऐवजी पर्यावरणपुरक विघटन होणार्‍या पत्रावळ्यांचा, 
     द्रोणचा वापर करावा व प्लास्टीक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा. 
9) कचरा व्यवस्थापन:- आपल्या मठ/संस्था इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ. दोन मोठ्या टिपामध्ये ओला व सुका 
  असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा. अन्न हे पुर्णब्रम्ह आहे. ते पायदळी तुडविले जाऊ नये व त्यापासुन अनारोग्य 
   व गलिच्छता निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जावी. 
10) नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे. 
11) शिळे अन्न, नासकी ङ्गळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.
12) धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. 13) अङ्गवांवर विश्‍वास ठेवू ना. 14) रुग्ण व्यक्तींना तात्काळ दवाखान्यात दाखल करा. टोल ङ्ग्री नं. 18002331923
15) पार्कींग व्यवस्था ठिकाणे-अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठामागे, इसबावी विसावा मंदिरसमोर, सांगोला रोड, एम.एस.ई.बी.समोर, कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली, 
डॉ. आंबेडकर नगर मरीआई पटांगण, कराड रोड गौतम विद्यालय जागेत वेअर हाऊस जवळ इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. 
     वरील सुचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget