.
.
.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हा ज्ञानाचा मापदंड – प्राचार्य डॉ. अशोक भोईटेपंढरपूर – “ देशामध्ये एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ ही आपल्या विद्यापीठाची स्वतंत्र ओळख असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीतच ज्ञानाच्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे यशाचा मापदंड म्हणून नावलौकिक मिळविला आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून घेतलेले अनेक निर्णय विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे आरोहन करुन विद्यापीठ गीत व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी लक्षात घेवून विद्यापीठाने खूप सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ होणार आहे. विद्यापीठीय शिक्षणातून देशाचा थेट विकास केला जातो. विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेवून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हीच राष्ट्राची खरी शक्ती असते. या शक्तीची जोपासना करुन विद्यार्थी सशक्त बनला पाहिजे. सशक्त विद्यार्थीच सशक्त देश घडवू शकतो.”

            
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

या प्रसंगी उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, उपप्राचार्य ए. एस. चंदनशिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्ही. एल. कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सिनिअर विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.  
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget