.
.
.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर आज व उद्या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन



‘पोलीस विद्यार्थी मैत्री चषक’द्वारे पोलीस आणि सामान्य जनता आणखी जवळ येणार 

पंढरपूर- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर आज (सोमवार दि. २६) व उद्या ( मंगळवार दि. २७ ऑगष्ट) रोजी पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व महाविद्यालयामधील १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पोलीस विद्यार्थी मैत्री-संबंध व पोलिसांविषयी असणारी भीती कमी आणि मैत्री वाढावी या हेतूने ‘पोलीस विद्यार्थी मैत्री चषक’ व्हालीबॉल स्पर्धेचे देखील आयोजन केल्याची माहिती निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी दिली.

          समाजातील शांतता अबाधित राहण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध वाढून मैत्री जपण्यासाठी आपसात सुसंवाद होणे गरजेचे आहे. यामुळे विविध उपक्रम राबविले जात आहे त्याचाच हा एक भाग असून महाराष्ट्र राज्याचे नूतन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्या संकल्पनेतून ‘पोलीसकाका’ आणि ‘पोलीस दीदी’ या संकल्पनेचा उदय झाला असून राज्यभर ही संकल्पना आमलात आणली जात आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे पोलीस आणि सर्व सामान्य जनता यांच्या मधील धागा आणखी भक्कम होणार आहे.  


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

याच हेतूने सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने स्वेरीच्या मैदानावर पोलीस-विद्यार्थी मैत्री चषका’चे आयोजन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी  आणि  पोलीस यांच्यात असणारे अंतर कमी व्हावे या हेतूने तसेच शिक्षण घेताना येणाऱ्या कॉलेज परिसरातील अडचणी ह्या पोलिसांपर्यंत पोहचविण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे. या उदात्त हेतूने पंढरपूर पोलीस उपविभागातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर आज (सोमवारी, दि. २६) व उद्या (मंगळवारी, दि. २७ ऑगष्ट २०१९) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे दोन दिवस पोलीस आणि ‘विद्यार्थी मैत्री’चषक व्हालीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 या हॉलीबॉल स्पर्धेतून सोलापुर ग्रामीण पोलीस दलातर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोकृष्ट खेळाडू असे चार स्मृतिचिन्ह देवून विजेत्याना गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते आज (सोमवार) सकाळी ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर,पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी यादव, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे उपस्थित राहणार आहेत.  

_________________________________________________


_________________________________________________

व्हालीबॉल स्पर्धेसाठी पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व महाविद्यालयातील १८ वर्षे खालील विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे (मोबा.क्र.८३०८८२३९९०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने  केले आहे.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget