.
.
.

महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी – अमृता फडणवीस


पुणे, ६ ऑगस्ट, २०१९ : ‘आज जेथे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. पुण्यातील सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’चे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अम्रिता पाटे आदि उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

नेहमी कला आणि फॅशन विश्वात रमणाऱ्या अमृता फडणवीस आज क्रिकेटविश्वातही तेवढ्याच रमल्या होत्या. संग्रहालय बघताना त्यांच्याकडून येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आठवणींनी त्यांना या क्षेत्राचीही बरीच माहिती असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. खास महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे ‘वन डे टी-शर्ट्स’ लावण्यात आले आहेत. यात झुलून गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिमा रॉड्राग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदिंचा समावेश आहे.

_________________________________________________


_________________________________________________

 “एखाद्याचा छंद जेंव्हा त्याचे ‘पॅशन’ बनते तेंव्हाच असे संग्रहालय निर्माण होऊ शकते.” अशा शब्दात फडणवीस यांनी पाटे यांचे कौतुक केले. “महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग उभारल्याने क्रिकेटचे हे संग्रहालय खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाल्यासारखे वाटते. येणाऱ्या पिढ्यांना हे संग्रहालय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. याशिवाय विधानसभेच्या सुरु होऊ घातलेल्या रणधुमाळीचा वेध घेत त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात मी नेहमीच प्रचारासाठी जाते तशी या वेळीही जाईन.” “केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी वैयक्तिकरित्या स्वागत करते. गेली कित्येक दशकं प्रलंबित असणारा काश्मीर प्रश्न यामुळे मार्गी लागण्याची आशा वाटते.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget