.
.
.

आयुष्यात नेमकं काय करायचे आहे ते ठरावा - प्रा. मुजावर




पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत

        पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी करिअरच्या अनेक संधी विविध क्षेत्रात उपलब्ध आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच भविष्यातील गोष्टींचे नियोजन निश्चित करा. चांगल्या सवयी तुम्हाला यश देत असतात. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सुरवातीपासून तुम्ही ध्येय ठरवा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी स्मार्ट अभ्यास करा. हे सर्व करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम आयुष्यात नेमकं काय करायचे आहे ते ठरविले पाहिजे. असे मत प्रा. आय. आय. मुजावर यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.

        कोर्टी, (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रथम वर्षं अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेप्रमुख पाहुणे प्रा. आय. आय. मुजावरडॉ. रविंद्र व्यवहारेडॉ. चेतन पिसेप्रा. समिर कटेकरप्रा. अनिल निकम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

        प्रमुख पाहुणे प्रा. मुजावर यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यातआला. दरम्यान प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी प्रथम वर्षातील शैक्षणिक आढावा सांगुन विशेष मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेन्टचे प्रा. समिर कटेकर यांनी नोकरी मिळविण्यासाठी प्रथम वर्षापासून संघर्ष करा म्हणजे शेवटच्या वर्षी तुम्हाला यश निश्चित मिळेल असे मत व्यक्त केले.   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

     ॲकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात हार्डवर्क घेतल्यास यश निश्चित मिळते. महाविद्यालयातील प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असतो या स्पर्धेतुन तुम्हाला नव-नवीन संकल्पना सुचतात त्या संकल्पनेतून तुमच्या ज्ञानात भर पडते. असे मत डॉ. व्यवहारे यांनी व्यक्त केले.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणालेविद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीघडविण्यासाठी शिक्षकांची खुप तळमळ असते त्या तळमळीने विद्यार्थ्यांने शिकले पाहिजेअसे मत व्यक्त केले. प्रा. मुजावर यांचे विविध विषयांवर ३ टप्यात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

         हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. आप्पासाहेब ढाणे यांनी मानले.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget