.
.
.

धोबी (परीट) समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा - आमदार प्रशांत परिचारक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


पंढरपूर 23 -कष्टकरी समाज म्हणून ओळख असणारा धोबी समाज सामाजिक, राजकीय व धार्मिक मागासलेला असल्यामुळे भारतातील 17 ते 18 राज्यात त्यांचा समाज अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे. मात्र एकाच देशात या समाजाचे दोन प्रवर्गामध्ये विभाजन झाल्याने त्यांचे मोठी नुकसान होत असून धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड।सीं;णवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिट (धोबी) समाज संघटनेने आमदार प्रशांत परिचारक यांना भेटून मागणी केली होती. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

धोबी समाज महाराष्ट्रातील भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1960 पुर्वी अनुसूचित जातीमध्येच होता. सन 1936 ते 1960 पर्यत या जिल्ह्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या. कारण भाषावर प्रांत रचनेपुर्वी विदर्भ (वर्‍हाडी) हा मध्यप्रदेश राज्यात होता. मध्य प्रदेशातील वर्‍हाड सध्याचा विदभ मधील 5 जिल्हे (रायसेन, सिंहोर, भोपाळ, भंडारा, बुलढाणा) या जिल्ह्यात राहणारा धोबी समाज अनुसूचित जातीत होता. परंतु दि.1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पाच जिल्ह्यातील तीन जिल्हे मध्यप्रदेशात आणि दोन जिल्हे (भंडारा आणि  बुलढाणा) महाराष्टात जोडले आहेत. तसेच डॉ.डी.एम.भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुर्नविलोकन समितीची घोषणा होऊन दि.5 सप्टेंबर 2001 रोजी राज्य शासनाने डॉ.डी.एम.भांडे समिती गठीत केली. या समितीने आपला अहवाल दि.28 फेब्रुवारी 2002 रोजी शासनाकडे सादर करून हा समाज मागास वर्गाचे सर्व निकष पूर्ण करतो अशी महत्वपूर्ण शिफारस केली आहे. यामुळे कायद्यानुसार धोबी समाज अनुसूचित जातीत समाविष्ट होऊ शकतो.

_________________________________________________


_________________________________________________

धोबी समाज संघटनेने आमदार परिचारक यांना,डॉ.डी.एम.भांडे समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्याच्या शिफारशीसह केंद्र शासनाला पाठ।वावा, श्रीसंत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित
करावे, श्रीसंत गाडगेबाबा कर्मभुमिस श्रीक्षेत्र ऋणमोचन जि.अमरावती येथे स्मारक उभारून त्यास निधी द्यावा, श्रीसंत गाडगेबाबा यांचा 23 फेब्रुवारी हा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून शासनाने घोषित करावा आदी मागण्या करण्यात आल्या. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन या विषयावर चर्चा करून लेखी पत्रद्बारे मागणी केली.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________

याबाबत मुख्यमंत्री मा.देवेंद्र फड।णवीस यांनी यावर सकारात्मकता दर्शविली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे सोलापूर जिल्हा परिट (धोबी) समाज संघटना, सोलापूर चे संजय
घोडके, दत्तात्रय क्षिरसागर, नामदेव वाघमारे, गणेश ननवरे, दयानंद पवार, विजय वाघमारे, दिगंबर गायकवाड, वैभव ननवरे, विजय वरपे, रामेश्‍वर साळुंखे, योगेश घोडके, विशाल घोडके, कैलास नवले, पिंटु गायकवाड ज्ञानेश्‍वर गायकवाड, सुनिल कारंडे, सतीश भोसले, कांतीलाल वरपे आदींनी निवेदन दिले.

_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget