.
.
.

विद्यार्थ्यांनी व्यसने सोडून आरोग्याशी नाते जोडावे - प्रो. डॉ. एस. व्ही. पाटील


पंढरपूर : “व्यसन ही शरीराला लागलेली वाईट सवय असते. तंबाखूच्या सेवनाने माणसाला कॅन्सर सारखा दुर्धर आजार होतो. व्यसनामुळे शरीर, मन, कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यसन सोडून आरोग्याशी नाते जोडण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी करावे.” असे आवाहन प्रो. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित ‘तंबाखू मुक्ती मार्गदर्शन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते. प्रो. डॉ. एस. व्ही. पाटील पुढे म्हणाले की, “जन्मत: कोणत्याही माणसाची गरज ही व्यसन नसते. शौक, मानसिक आघात, अपयश, विनाकष्ट मिळालेला पैसा अशा कारणांनी व्यसन केले जाते.   

________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

सुरुवातीस मर्यादीत स्वरुपात केलेले व्यसन पुढे प्रबळ होते. त्यामुळे व्यसनापासून मुक्ती मिळविण्याआधी व्यसनास प्रतिबंध केला पाहिजे. तंबाखूमधील निकोटीन व टॉक्सिन या घटकांनी शरीरामध्ये विविध आजार निर्माण होतात.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “योग्य औषधोपचार व मनाची तयारी या बाबींच्या आधारे व्यसनांपासून सुटका मिळविता येते. अनेक सामाजिक संघटना व्यसन मुक्तीसाठी कार्यरत आहेत. त्या संघटनांचे बहुमोल कार्य आहे. सध्याचा युवक हा लवकर व्यसनांना बळी पडतो. त्यामुळे देशापुढे नवीन आव्हान उभारले आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी व्यसनमुक्ती साठी झटले पाहिजे.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एफ. एस. बिजापुरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रशांत नलवडे यांनी केला. तर सुत्रसंचालन प्रा. अल्का घोडके यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर मधील कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. चतुर्भुज गिड्दे यांनी मानले. 

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget