.
.
.

चंद्रभागेच्या पात्रात बुडाला दुधाचा टँकर... अनेकांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता



पंढरपूर / प्रतिनिधी :- वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चंद्रभागा नदीच्या पात्रात पुलावरून खाली पडलेला दुधाचा टँकर वाहन चालकासह नदीपात्रात बुडाला. याप्रकरणात वाहन चालकासह इतर प्रवाशांची जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली ज्याठिकाणी गाडी बुडाली त्या ठिकाणीच ती सापडली होती परंतु क्रेन ने वर उचलताना पुन्हा नदीपात्रात पडली असल्याचे समजते. नदीपात्रातील विसर्ग वाढतच असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमालीचा वाढलेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचणी वाढत आहेत.
   गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कुर्डूवाडी वरून दुधाने भरलेला टँकर पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर आला असता वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून नदीपात्रात कोसळला. याबाबत समजलेल्या माहितीनुसार हा टँकर तिरूमला डेरीचे दूध संकलन करण्याकामी कार्यरत होता.  टी एन 88  डी 8241 हा दुधाचा टँकर कुर्डूवाडी कडून पंढरपूरकडे येत होता. नदीपात्रात कोसळलेल्या या टँकर मध्ये एक वाहनचालक असल्याची माहिती तिरूमला कंपनीने दिली असली तरी, घटना घडली यावेळी नदीपात्रात टँकरसह तीन लोकांना बुडताना पहिल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत. यामुळे या घटनेत जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभर क्रेनच्या साह्याने हा टँकर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गुरुवारी रात्री उशिरापर्यंत यश आले नाही. दरम्यान चंद्रभागा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्याने या टँकरचा पत्ता लागणे अवघड होत आहे. यामुळे शोध पथकाचे काम वरचेवर जिकिरीचे बनत आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget