.
.
.

विठोबाच्या मूर्तीवर लवकरच इपॉक्सी कोटींग लेप


प्रतिनिधी पंढरपूर :- वारकरी भाविक-भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठोबाच्या मुर्तीचे संवर्धनासाठी लवकरच मुर्तीवर इपॉक्सी कोंटींग केले जाणार आहे.  याबाबत मंगळवारी मंदिर समितीच्या बैठकीत चर्चेअंती निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीच्या सदस्या अ‍ॅड.माधवी निगडे यांनी दिली. येथील नूतन भक्त निवासामध्ये मंदिर समितीची बैठक झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत काही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होउन निर्णय घेण्यात आलेल आहेत.

    यामध्ये प्रामुख्याने विठोबाच्या मुर्तीचे संवर्धन व्हावे.तसेच यासाठी पुरातत्व खात्यांने सध्द्याच्या मुर्तीस इपॉक्सी कोंटींग अर्थात लेप लावण्यास परवानगी दिली आहे. सदरच्या इपॉक्सी कोंटींग करण्यांच्या विषयाला मंदिर समिती सदस्यांनी मंजूरी दिली. विशेष म्हणजे इपॉक्सी कांटींेगसाठी पुरातत्व भिागाचे मार्गदर्शन देखील घेतले जाणार आहे.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यासाठी सदरच्या निर्णयांचा येणार्‍या खर्चास आणि प्रस्ताव निधी व न्याय खात्यांची परवानगी घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर कमी गर्दीचे दिवस पाहून विठोबाच्या मुर्तीस इपॉक्सी कोंटींग केले जाणार असल्याचेही मंदिर समिती सदस्या अ‍ॅड. निगडे यांनी सांगितले. मुर्तीच्या संवर्धनासाठी सुमारे पाच ते सहा वर्षापूर्वी मंदिर समितीच्या वतीने आणि पुरातत्व खात्यांच्या माध्यमातुन विठोबाच्या मुर्तीस लेप लावण्यात आलेला होता. यानंतर आता पुन्हा एकदा मुर्ती संवर्धनासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  

     या निर्णया शिवाय या बैठकीत मंदिर समितीचे नूतन भक्तनिवासाचे काही काम वेळेत पूर्णत्वाकडे नेले नाही. म्हणून भक्तनिवासाचे ठेकेदारास चार लाखांचा दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरात येणार्‍या पाच प्रमुख मार्गार स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत.याशिवाय नविन भक्तनिवासासमोर एक अद्ययावत असे ऑडिटोरीअम देखील उभे करण्यात येणार आहे. याचा आराखडा नुकताच समितीच्या सदस्यांसमोर बैठकीत सादर करण्यात आलेला आहे.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget