.
.
.

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण



लायन्स व लायनेस क्लब पंढरपुरतर्फे शिक्षक दिन साजरा

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुरतर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व त्यांच्या स्मृतिनिमित्त साजरा केला जाणारा शिक्षक दिन पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयामधे साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व मा.सौ सीमाताई परिचारक उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते तसेच शिक्षण समिती सभापती भाग्यश्रीताई शिंदे व मा सभापती विवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


             लायन्स क्लबने या वर्षी समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे डॉ सुजाता गुंडेवार यांनी सांगितले. कोणताही प्रस्ताव न मागवता विद्यार्थी आणि समाजाची मते विचारात घेवून शिक्षक निवडले गेले.         

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


लायन्स लायनेस क्लब कडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद नारायण पुरी लोकमान्य विद्यालय, महेश शरदराव भोसले मातोश्री निर्मलादेवी प्रशाला,भारत गणपत आदमिले आपटे उपलप प्रशाला, शिवाजी गजेंद्र नागटिळक मोहसिन विद्यालय, सौ हर्षदा हरीश ताठे लोकमान्य विद्यालय, भाऊसाहेब सदाशिव गंगनमले नगरपरिषद प्राथमिक मुलींची शाळा नं ८, नानासाहेब प्रभाकर नरळे नगरपरिषद प्राथमिक शाळा नं १५, रघुनाथ शिवाजी कुलकर्णी कवठेकर प्रशाला नथचौक, सौ मैत्रेयी मंदार केसकर आदर्श प्राथमिक विद्यालय, ललिता सावळाराम कोळवले मोहसिन विद्यालय इसबावी, श्रीमती राणी रामकृष्ण साखरे नगरपरिषद शाळा, चिंतामणी विष्णू दामोदरे द.ह.कवठेकर प्रशाला, या शिक्षकांना गौरविण्यात आले.


या प्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व देशाचा सांस्कृतिक पाया निर्माण करणारा कारागीर म्हणजे शिक्षक असल्याचे सांगितले, मा सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की स्वत:चे दु:ख विसरून विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद साजरा करणारे, दु:खात विद्यार्थ्यांना आधार देणारे शिक्षक असतात.देशाच्या जडणघडणीतील शिल्पकार हा शिक्षक असल्याचे सांगितले, सौ सीमाताई परिचारक यांनी सांगितले कि भारतीय संस्कृती मध्ये शिक्षकांचे स्थान खुप महत्वाचे आहे, पुर्वीचा इतिहास पाहिला असता गुरु द्रोणाचार्य, महर्षी वाल्मीकी  यांचे राजा महाराजांच्या काळात खूप मोठा मान असुन देशाचे पिढी घडवण्याचे कार्य शिक्षक करत आले असल्याचे सांगितले.              



_________________________________________________


_________________________________________________


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक इरकल सर यांनी केले ,प्रस्तावना डॉ सुजाता गुंडेवार यांनी तर रा.पां.कटेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी लायन्स अध्यक्षा डॉ.सुजाता गुंडेवार, ला.रा.पां.कटेकर,नगरसेवक ला. विवेक परदेशी,  भारत वाघुले,ला.मंदार केसकर, ला.कौस्तुभ देशपांडे, ला.लता गुंडेवार, ला.डॉ. ऋजुता गोळवलकर,ला.ईमरान मुल्ला, लायनेस अध्यक्षा-डॉ. पल्लवी माने,ला.गुलताज भायाणी ला.उर्मिला गुंडेवार,ला.प्रतिक्षा येलपले,स्नेहा गोसावी,विजया वाघुले,विशालाक्षी पावले आदि उपस्थित होते.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget