.
.
.

राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील


घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन

 पुणेदि. 8 :- राष्ट्रीयराज्य, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगतानाच राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

  घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी  महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीष बापट, आ. दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.    


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

  पालकमंत्री श्री. पाटील म्हणालेराज्यात रस्ते विकासाला गती देण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग 17 हजार किलोमीटरने वाढविण्यात आले आहेत. राज्यात 10 हजार किलोमीटर तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगतानाच मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाची कामे गतीने पुर्ण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

  राज्यात एकूण 165 रेल्वे फाटक असून तीन वर्षापुर्वीच या रेल्वेफाटकावर उड्डाणपूल व्हावे, यासंदर्भात निर्णय घेत 170 उड्डाणपूलांची कामेही पुर्णत्वास आली आहेत, उर्वरित उड्डाणपूलांची कामेही दोन वर्षात पुर्ण करण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या योजनांचा सामान्य नागरिकांना मोठया प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगितले.    

_________________________________________________


_________________________________________________

प्रास्ताविक करताना महापौर मुक्ता टिळक यांनी घोरपडी उड्डाणपूलाचे काम 36 महिन्यात पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

      यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर यांचीही भाषणे झाली.  यावेळी  नागरिकमहिला व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget