पंढरी दर्शन - माझे माहेर पंढरी| आहे भिवरेच्या तिरी||

माझे माहेर पंढरी । आहे भिवरेचे तीरी ।।
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।
माझी बहिण चंद्रभागा । करितसे पापभंगा ।।
पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ।।
एका जनार्दनी शरण । करी माहेरची आठवण ।।


नामदेव पायरी



संतांच्या चरणधूळीचा लाभ व्हावा म्हणून ‘ नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।’ असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली . नामदेव महराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी व संत जनाबाई यांनी सुध्दा याच ठिकाणी समाधी घेतली . त्यामुळे पांडुरंग मंदिराची पायरी ही नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते

. मंदिराच्या पायऱ्या पितळेने मढवलेल्या असून पहिल्या पायरीवर नामदेव महाराजांच्या परिवारातील सर्व व्यक्तींच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत . याच पायरीवर संत नामदेवांचा मुखवटा ठेवून त्याला पोशाख करतात . अलीकडे दर्शन घेणे सोयीचे व्हावे म्हणून पितळेचा उंच  चौरंग केला असून त्यावर मुखवटा ठेवून पोशाख करतात .
आषाढ वद्य त्रयोदशी ला या ठिकाणी संत नामदेव महाराज पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जातो .

यात्रा


आषाढी , कार्तिकी , चैत्री व माघी या पंढरपूरच्या मुख्य यात्रा आहेत .
पंढरपुरात दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला वारकरी वारीसाठी येतात . सर्व फडांवर यानिमित्त कीर्तन व भजनाचे ठरलेले कार्यक्रम होतात .
आषाढी यात्रा – सर्व एकादशी मध्ये आषाढी वारी सर्वात मोठी असते . या वारीसाठी विविध संत क्षेत्रातून पालखी सोहळे पायी वारी करीत पंढरीला येतात .
आषाढी यात्रेनिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून व बाहेरील राज्यातून वारकरी पायी वारी करीत व वाहनांनी पंढरीला येतात . विविध संत क्षेत्रातून संतांच्या पालख्या येतात . 
कार्तिकी वारी  – आषाढी नंतर दुसरी मोठी वारी – कार्तिकी वारी असते .
याशिवाय चैत्री व माघी वारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरते .
चैत्री वारी –
माघी वारी – 
अश्विन शु. दशमी अर्थात दसऱ्याला सुद्धा देवाला सोने देण्यासाठी अनेक वारकरी येतात . यादिवशी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होते . यादिवशी देवाला दुपारी काठी , घोंगडी चा पोशाख होतो . हा पोशाख हे भाविकांचे मुख्य आकर्षण असते.
संक्रांत – संक्रांतीच्या दिवशी देवाला तिळगुळ देण्यासाठी व ओवाश्यासाठी भाविकांची गर्दी होते . यात महिला भाविकांचे प्रमाण अधिक असते . या दिवशी दर्शन अधिक काळ  यावे यासाठी रुक्मिणी मातेला पहाटेच वस्त्रालंकार  घातले जातात. दुपारी पोशाख बदलत नाहीत .

आषाढी यात्रा – १. पलंग निघणे


आषाढी वारी – १
पलंग निघणे
दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला वारकरी पंढरपूरला वारीला येतात . पंढरपुरात विविध फडांवर कीर्तन , जागर वगैरे कार्यक्रम होतात . आषाढी वारी ही पंढरपूरातली सर्वात मोठी यात्रा . आषाढी वारीसाठी विविध संत क्षेत्रातून पालख्या , दिंड्या पंढरपूरला येतात . साधारण १० लाख किंवा अधिक भाविक यानिमित्त पंढरपूरात येतात .
एरवी दररोज दिवसात साधारण १५ ते १६ तास विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते . रोज रात्री शेजारती नंतर दर्शन बंद होते . पहाटे काकडा आरती , महापूजा व आरती होऊन दर्शन सुरू होते . दुपारी नैवेद्य (१५ ते २० मिनिटे ), ४.३० वाजता पोशाख बदल (अर्धा तास ), धुपारती (अर्धा तास ) यानिमित्त दर्शन बंद असते .
आषाढी वारीत मात्र देवाचे हे सर्व उपचार बंद असतात . अहोरात्र भाविकांना देवाचे दर्शन घेता येते . उपचार बंद होण्यास – पलंग निघणे असे म्हणतात .
पूर्वी आषाढ शु. पंचमीस देवाचा पलंग निघत असे . अलीकडे आषाढ शु. प्रतिपदेलाच पलंग निघतो . यादिवशी शेजघरातील देवाचा पलंग बाहेर काढला जातो . शेजघर रिकामे केले जाते . श्रम परिहारार्थ देवाच्या मागे लोड तर आईसाहेबांच्या पाठीमागे तक्का ठेवतात .
रोज सकाळी ५ ते ६ नित्यपूजा व नैवेद्य होतो . दुपारी ११ वाजता महानैवेद्य होतो . संध्याकाळी पोशाख बदल व धुपारती होत नाही . रात्री ९ वाजता लिंबू पाणी व रात्री १० वाजता दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात . रात्री शेजारती होत नाही . रात्रभर दर्शन चालू असते. अशाप्रकारे अहोरात्र साधारण २२ तास दर्शन सुरू असते. हा दिनक्रम आषाढी वारी संपेपर्यंत चालू राहतो .
आषाढ शु. पौर्णिमेला सर्व संतांच्या पालख्या परत जातात . रात्री देवाची पालखी नागरप्रदक्षिणेला निघते . दुसऱ्या दिवशी – वद्य प्रतिपदेला महाद्वार काला होतो . त्यानंतर वद्य पंचमीस प्रक्षाळ पूजा होते . पलंग पुन्हा शेजघरात ठेवतात . या दिवसापासून देवाचे उपचार पुन्हा सुरू होतात .

आषाढ शु. एकादशी


आषाढ शु. एकादशी
5286915543902583735_Org
आषाढ शु. एकादशी हा वारीचा मुख्य दिवस. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीला रात्री ११ वाजता खाजगीवाले यांच्यातर्फे विठ्ठल रूक्मिणी ची पाद्यपूजा होत असे. सध्या काही वर्ष ही पूजा बंद झाली आहे. खाजगीवाले हे पेशव्यांचे सरदार होते. त्यांनी एकादशीच्या दिवशी रथोत्सव सुरु केला. पंढरपूरात त्यांचा वाडा होता. आता त्या जागी माहेश्वरी धर्मशाळा आहे. नंतर संस्थान तर्फे नित्य पूजा होते. या पूजा नंतर  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होते. या पूजेचा खर्च सरकार तर्फे केला जातो.  यालाच शासकीय महापूजा असे म्हणतात.  अलिकडे दर्शन रांगेत उभ्या असणार्या एका भाविक जोडप्याला सुद्धा या पूजेत सहभागी करून घेतले जाते. विठ्ठल व रूक्मिणी मातेची पूजा झाल्यावर भाविकांचे दर्शन सुरु होते. सध्या महापूजा कमीत कमी वेळात होऊन दर्शन लवकर सुरु होण्यासाठी खास प्रयत्न केले जातात.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा व पूजेत सहभागी जोडप्याचा मंदिर समिती तर्फे सत्कार होतो. गेले पाच वर्ष दिवाळी अंकांच्या धर्तीवर रिंगण तर्फे आषाढि अंक काढला जातो.  या अंकाचे प्रकाशन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते या कार्यक्रमात केले जाते.
5203563236860951342_Org
पंढरपूरला आलेल्या सर्व संतांच्या पालख्या व दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. नगरप्रदक्षिणा मार्गावर चंद्रभागे पाशी आल्यावर पादुकांना चंद्रभागा स्नान घातले जाते.
एकादशी च्या दिवशी देवळातून रथ अथवा पालखी निघत नाही.  सरदार खाजगीवाले यांनी सुरु केलेला रथोत्सव मात्र होतो. हा रथ माहेश्वरी धर्मशाळेतून निघून प्रदक्षिणा मार्गावर फिरून पुन्हा संध्याकाळी धर्मशाळेत येतो.
सकाळी दिंड्या व पालख्यांची नगरप्रदक्षिणा,  दुपारी रथोत्सव व रात्री विविध फडांवर होणारे कीर्तन,  जागरणाचे कार्यक्रम यामुळे पंढरी नगरी दुमदुमून जाते.
पायी वारी केलेले अनेक भाविक एकादशी च्या दिवशी पहाटेच परतीचा प्रवास सुरु करतात. काही भाविक दुसर्या दिवशी बारस सोडून निघतात. तर काही भाविक पौर्णिमे पर्यंत थांबतात.
gopalpur kala
वारकरी संप्रदायात काल्याला असाधारण महत्व असून प्रत्येक उत्सवाची,  कार्यक्रमाची सांगता काल्याने होते. वारीची सांगता सुद्धा पौर्णिमेला  काल्याने होते. हा काला गोपाळपूर येथे होतो.
पौर्णिमेच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या गोपाळपूरला जातात. या मंदिर परिसरात काल्याचे कीर्तन होते. त्यानंतर गोपाळपूर मंदिराला प्रदक्षिणा घालून पालख्या परत पंढरपूरला येतात. गेल्या काही वर्षापासून एक नवीन प्रथा सुरु झाली आहे. यानुसार या दिवशी दुपारी पालख्या मंदिरात देव दर्शनासाठी येतात. दुपारी जेवणा नंतर पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो.
10552481_892788017415108_8725732232033175503_n
पौर्णिमेच्या दिवशी पालख्या परत गेल्यावर सुद्धा गर्दी असते. या दिवशी रात्री नगरवासीयांना दर्शन देण्यासाठी देवाची पालखी निघते.  पालखी मुख्य मंदिरातून निघून  नगरप्रदक्षिणा मार्गावरून रात्री मंदिरात परत येते. पालखी सोबत ह. भ. प. चवरे यांची दिंडी असते. याशिवाय वासुदेव,  दिवटी घेतलेले भाविक, छत्र, अब्दागिरी इ. पालखी सोबत असतात.
पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी विठ्ठल मंदिरात काला करतात. याला महाद्वार काला असे म्हणतात.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments