सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजास न्याय मिळवून द्या आदिम विकास परिषदेच्या वतीने आ.निलम गोरे यांना निवेदन


सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबीत आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव समाजास हे दाखले मिळू नयेत म्हणून झारीतील शुक्राचार्याची भुमिका कायम बजावली आहे.त्यामुळेच आघाडी सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजास जाणून बुजून वंचीत ठेवण्यात आले.राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपानेही याबाबत ठोस भुमिका घेतली नसल्याने कोळी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्यामुळे आता निदान शिवसेनेने तरी आम्हास न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन आज आ.निलम गोरे यांना सोलापूर जिल्ह आदिम विकास परिषदेच्या वतीने देण्यात आले.
           या बाबत अधिक माहिती देताना आदिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की,गेल्या कित्येक दशकापासून सोलापूर जिल्हयातील कोळी महादेव समाज अनुसुचीत जमातीच्या जातीच्या दाखल्यासाठी आंदोलने,मोर्चे,उपोषणे आदी मार्गाने शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र आम्हास न्याय मिळाला नाही. सत्तेवर येताना भाजपा सरकार मधील अनेक नेत्यांनीही आम्हास हा प्रश्‍न तात्काळ सोडवू आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन केले होते.मात्र आज त्यांनाही आमच्या या जिवन मरणाच्या प्रश्‍नाचा विसर पडला आहे. शिवसेनेने प्रथमपासुनच वंचीत घटकांना न्याय देण्याची भुमिका बजावली असून सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजास त्वरीत न्याय मिळावा यासाठी आपण शिवसेनेच्या माध्यमून पाठपुरावा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याचे ते म्हणाले.
      हे निवेदन देताना प्रशांत परचंडे,गणेश अधटराव,नरेश जवंजाळ,धिरज परचंडराव,प्रज्वल परचंडराव,संदीप परचंडराव,तात्या कोळी,बंटी परचंडराव,विलींद परचंडराव,विजय सुरवसे,नितिन पानकर यांच्यासह आदिम विकास परिषदेचे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments