नगरसेवक संदीप पवार हत्याकांडातील 4 आरोपी 2 पिस्टलसह पोलिसांच्या ताब्यात... हत्याकांडानंतर ठाणेतील पेट्रोल पंप लुटून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते सारे..! बघा पिस्टलच्या फोटोसह सविस्तर बातमी फक्त पंढरपूर लाईव्ह वर!!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

नगरसेवक संदीप पवार हत्याकांडातील 4 आरोपी 2 पिस्टलसह पोलिसांच्या ताब्यात... हत्याकांडानंतर ठाणेतील पेट्रोल पंप लुटून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते सारे..!  बघा पिस्टलच्या फोटोसह सविस्तर बातमी फक्त पंढरपूर लाईव्ह वर!!

पंढरपूर LIVE 20 मार्च 2018


पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची भरदिवसा हत्या करून पसार झालेल्या चार आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोन पिस्टलसह ताब्यात घेतले असुन त्यांचेविरूध्द वर्तकनगर, ठाणे पोलीस ठाण्यातही दरोड्याच्या गुन्हयाबाबत विविध कलमान्वये नोंद करण्यात आली आहे.
आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केलेले दोन पिस्टल.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची हत्या करून फरार झालेले 6 आरोपी दि. 19 मार्च 2018 रोजी रात्री साडे सहा वाजण्याच्या सुमारास ज्युपिटर हाॅस्पिटल जवळील हरदास नगरकडे जाणार्‍या सर्व्हिस रोढचे नाल्याजवळ माजीवाडा, ठाणे येथील पेट्रोल पंप लुटण्यासाठी आले असताना यातील चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोन पिस्टल व दरोड्याच्या साहित्यासह अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन यातील  दोघेजण पळून गेले.  ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  प्रदीप आर. शर्मा यांना आधीच गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी या ठिकाणी आधीच दोन पथके तयार ठेवली होती.
अक्षय उर्फ बबलु धनंजय सुरवसे, पुंडलिक शंकर वनारे (33), मनोज शंकर शिरशीकर  (32), भक्तराज ज्ञानेश्वर धुमाळ (26) यांना पकडण्यात आले असून संदीप अधटराव, विकास उर्फ विकी मोरे हे पळुन गेले आहेत. हे सर्व आरोपी पंढरपूर चे रहिवाशी असून त्यांनी टोळी युध्दातून पंढरपुरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्याकांडानंतर ठाणेतील पेट्रोल पंप लुटून  मिळालेला पैसा घेऊन घोडबंदर मार्गे गुजरात ला पळून जाण्याचे त्यांनी ठरवले होते. 
वरील सर्व आरोपींविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात पो. उपनिरीक्षक कदम यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम 399, 402, सह अर्म अॅक्ट 3, 25, (1-ब) (अ) सह महा. पो.का. कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असेन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश गावंड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त परमबिर सिंह, पोलीस सहआयुक्त मधुकर पांण्डेय, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त  मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त गुन्हे  अभिषख त्रिमुखे, सहाय्यक पोलीस आयुक्त  गुन्हे (शोध-2) एन. टी. कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस प्रदीप शर्मा, पो.नि. राजकुमार कोथमिरे, पो.नि. विकास घोडके, पो.उ.नि. विकास बाबर, पो.उ.नि. विलास कुटे, पो.उ.नि. हेमंत ढोले, पो.उ.नि. अविनाश महाजन, पो.हवा. ईश्वर बुकाने, बजरंग गोसावी, सुरेश मोरे, अंकुश भोसले, पो.ना. हेमंत महाले, महेश साबळे, संदीप भांगरे यांनी केली.
या कामगिरीबद्दल वरील सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments