पंढरीत थरार... नगरसेवक संदीप पवार यांचेवर गोळ्या झाडून धारधार शस्त्राने केले वार!!

पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 18 मार्च 2018


पंढरपूर शहरात आज ऐन गुढी पाडव्याच्या दिवशीच स्टेशनरोडवर थरारक घटना घडली. पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप पवार यांचेवर गोळ्या झाडून शस्त्राने वार करत अज्ञात खुनी हल्ला केला. स्टेशनरोडवरील हॉटेल श्रीराम भोजनालया जवळ हा हल्ला करण्यात आला.  नगरसेवक संदीप पवार यांना पोलिसांनी तात्काळ पोलिस व्हॅनमध्ये घालून येथील अपेक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलेे.  त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले असल्याचे समजते.

आज रविवार दि. 18 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संदीप पवार हे सदर हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे चहा पित असराना चार ते पाच नकाबपोश तरुण तेथे आले व त्यांनी संदीप पवार यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. यानंतर संदीप पवार हॉटेलच्या बाहेर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करुन अज्ञात आरोपी पळुन गेले. अशी प्राथमीक माहिती समजते.

घटनेनंतर पंढरपूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील सर्व पेट्रोल पंप, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे सहा. पोलिस निरीक्षक धोत्रे आदींसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सोलापूर जिल्हा ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनीही पंढरीत येवून घटनास्थळाची पाहणी केली असून त्यांच्या आदेशान्वये पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.













पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे