पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पर्वा कुणाला ? कासार घाटावर इंजेक्शन च्या सुया!!
पंढरपूर LIVE 18 मार्च 2018
कासार घाटावरच्या पायऱ्यांवर आज कुणीतरी वापरलेली इंजेक्शन्स आणून टाकत असल्याचे या भागातील कांही नागरिकांच्या निदर्शनास आल्या आहेत. पंढरपूर लाईव्ह कडे त्याचे फोटो काढून पाठवत एका जागृत नागरिकाने "पर्वा कुणाला?" अशी प्रतिक्रिया दिलीय.
खरंच या नागरिकाची प्रतिक्रिया खुपच बोलकी आहे. इंजेक्शनच्या अणकुचीदार सुया पाहिल्यावर मनात धडकी भरल्याशिवाय रहाणार नाही. या घाटावरून अनेक भाविक चंद्रभागेकडे स्नानासाठी जातात . कित्येक जनावरे या भागात चरतात . या सगळ्यांसाठी या सुया धोकादायक ठरू शकतात. हे ही इंजेक्शन इथे टाकणाऱ्या व्यक्तीला समजले नसेल का ?
खरंतर रूग्णालयात वापरली गेलेली औषधं, इंजेक्शन्स, पट्ट्या वगैरे टाकावु वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळे नियम बंधनकारक आहेत. परंतु इथं सगळे नियम मोडून कुणीतरी चक्क घाटाच्या पायर्यावर अशा प्रकारे इंजेक्शन्स फेकत असेल तर ते अक्षम्य आहे. ही बाब वरवर क्षुल्लक वाटत असली तरी ही खुप मोठी बेपर्वाई आहे. आपले शहर हे एक तीर्थक्षेत्र आहे. त्याचे पावित्र्य राखण्यासोबतच हे शहर स्वच्छ राखणं आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी सजग राहून असे प्रकार करणारांना पकडून त्यांना समज देणं गरजेचं आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments