नगरसेवक संदीप पवार हत्याकांडातील मुख्य संशयीत आरोपी बबलु उर्फ अक्षय सुरवसेसह अन्य तीन आरोपींना ठाण्यात अटक

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

नगरसेवक संदीप पवार हत्याकांडातील मुख्य संशयीत आरोपी बबलु उर्फ अक्षय सुरवसेसह अन्य तीन आरोपींना ठाण्यात अटक

पंढरपूर LIVE 19 मार्च 2018


पंढरपूरमध्ये काल दि. 18 मार्च रोजी घडलेल्या नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयीत आरोपी बबलु उर्फ अक्षय सुरवसेसह अन्य तिघांना ठाणे येथे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पंढरपूर चे डी.वाय. एस. पी. निखील पिंगळे यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली.

संदीप पवार यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा पवार यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या हत्याकांडात प्रमुख संशयीत आरोपी बबलु उर्फ अक्षय सुरवसे (सध्या रा. सांगली) याच्यासह त्याच्यासोबत मनोज शिरशीकर, भक्तराज धुमाळ व पुंडलिक वनारे (रा.पंढरपूर) यांना ठाणे शहर पोलीस खंडणी विरोधी पथकाने आज रात्री उशीरा अटक केलीय. 

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याकांडातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पंढरपूर चे डीवायएसपी तथा आयपीएस अधिकारी निखील पिंगळे हे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

तातडीने या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी व 
पंढरीतील शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सर्वसामान्य पंढरपूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पंढरपूरकरांना डीवायएसपी निखील पिंगळे यांनी केले आहे.पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments