पंढरीत मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा घडलेल्या विद्यमान नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याकांडामुळे हादरली पंढरी...! पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांची घटनास्थळास भेट... पोलिसांची तीन पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना!

पंढरपूर LIVE 18 मार्च 2018


पंढरपूर नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार हे आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास स्टेशनरोडवरील हॉटेल श्रीराम येथे आपल्या मित्रांसोबत चहा पीत असताना त्यांची निर्घृण हत्या तोंडाला मास्क बांधलेल्या पाच ते सात अज्ञात तरुणांनी केली. संदीप पवार यांच्या डोक्यावर सत्तुरचे वार करण्यात आले. त्यांच्या पोटात चार गोळ्या तर छातीत 1 गोळी घालण्यात आली. पंढरपूर येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूर येथील अश्‍विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


दरम्यान सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सहा. पोलिस निरीक्षक बुवा, सहा. पोलिस निरीक्षक धोत्रे आदी उपस्थित होते. सी.सी.टी.व्ही. चे फुटेज पोलिसांकडून बारकाईने तपासण्यात येत आहेत. पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या विशेष सुचनेनुसार गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. 


आज ऐन गुढी पाडव्याच्या दिवशीच पंढरीतील मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा एका नगरसेवकाचे अशा प्रकारे गोळ्या घालून निर्घृण हत्याकांड घडल्यामुळे पंढरीतील सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सर्वत्र कमालीची तणावपुर्ण शांतता असून स्टेशन रोड, बाजारपेठ, मंदिर परिसर आदी सर्व भागात शुकशुकाट पसरला आहे. या हत्याकांडातील आरोपींचा तपास पोलिसांनी तातडीने लावावा व भुवैकुंठ पंढरीतील शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे यांनी येथील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवावा! अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments