धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 17 मार्च 2018


पंढरपूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर शेठ जाधवजी जेठाभाई धर्मशाळा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नितीन शेळके, सुनंजय पवार व सर्व शिवभक्त उपस्थित होते.
या शिबीरास शिवभक्तांनी व शंभूभक्तांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. सुमारे 91 रक्तदात्यांनी रक्तदान करून शंभू महाराजांना अभिवादन केले. तसेच शिवशंभु स्फूर्तीचे पठण केले. यावेळी सरजूबाई बजाज ब्लड बँक व पंढरपूर ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले. शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान करून अभिवादन करण्यात येते.











पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments