पंढरपुरच्या अपक्ष नगरसेवकाच्या खुन्यांना दोन पिस्टलसह अटक! नगरसेवक संदीप पवार यांचे खरे खुनी गजाआड! जवळचे पैसे संपल्याने ठाण्यात लुटमारीच्या प्रयत्नात होते!! टोळी युध्दातून पंढरपूर चे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा खुन केल्याची कबुली!!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 20 मार्च 2018


पंढरपुरच्या अपक्ष नगरसेवकाच्या खुन्यांना दोन पिस्टलसह अटक!
नगरसेवक संदीप पवार यांचे खरे खुनी गजाआड! जवळचे पैसे संपल्याने ठाण्यात लुटमारीच्या प्रयत्नात होते!!
टोळी युध्दातून पंढरपूर चे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा खुन केल्याची कबुली!!

पंढरपुरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा रविवारी दिवसाढवळ्या खुन करून पसार झालेल्या चौघा खुन्यांना दोन पिस्टलसह ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास ठाण्यातून अटक केली . त्यांच्याकडून दरोड्याची सामुग्रीही हस्तगत करण्यात आली आहे.

सात ते आठ जणांची सशस्त्र टोळी ठाण्यातील माजीवाडा येथील पेट्रोल पंपावर पंप लुटण्यासाठी येणार सल्याची " टीप " गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप शर्मा यांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरोड्याच्या तयारीतील अक्षय सुरवसे ( वय २२ ) पुंडलिक वनारे ( वय ३३ ) मनोज शिरसीकर ( वय ३२ ) आणि बसवराज धुमाळ ( वय २६ रा . सर्व पंढरपूर ) या चौघांना पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडील सखोल चौकशीत त्यांनी टोळी युध्दातून पंढरपुरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्यावर एका हाँटेलाच्या बाहेर पाच गोळ्या झाडून खुन केल्याची कबुली दिली . खुनानंतर या टोळीने त्यांच्यावर चाँपरने हल्ला केला होता या खुनासाठी वापरलेले दोन पिस्टलही हस्तगत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे . विशेष म्हणजे जवळचे पैसे संपल्यामुळे हे टोळके ठाण्यात पुन्हा लुटमार करण्याच्या तयारीत होते त्यावेळी ठाणे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

सदर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस. पी. निखील पिंगळे  प्रयत्न करत असल्याचे समजते.पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments