महावितरण कंपनीचा अजब कारभार;बोगस कंपनीच्या नावे लुटली लाखोंची बिले... शिवरत्न च्या नावाचा गैरवापर करुन झाली आर्थिक लूट!

पंढरपूर LIVE 21 मे 2018

                                                
  अकलुज-  दि 21   महावितरण कंपनीच्या अकलूज विभागीय कार्यालयात मागील काही वर्षापासून अनाधिकृत व बेकायदेशीर कंपनीच्या नावे लाखोंची बिले उचलण्यात आली असून दोषी असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर कड़क कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत असून दि22 मे पासून याप्रकरणी आमरण उपोषण करण्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब शेंडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.     

                                 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकलूज येथील महावितरण कंपनी मध्ये आउट सोर्सिंग (कॉन्ट्रैक्ट बेसवर कामगार)ची कामे ज्या कंपनीने केली आहेत त्या कंपनीने आपले रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे तसेच कामगार यादी राज्य कामगार विमा व पी एफ यादी या सर्व बाबी विचारात घेवून कार्यकारी अभियंता यांनी सदर कंपनीला कॉन्ट्रेक्ट बेसवर कामगार पुरविन्याचे करार करने बंधनकारक होते परंतु सदर कंपन्या ह्या बोगस असून कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नसलेले दिसून येत आहे तसेच कामगार आयुक्तांची दिसून येत नाही .या सर्व बाबीमध्ये कार्यकारी अभियंता अकलूज यांचाच सहभाग असल्याने त्यांच्यावर पदाचा दुरूपयोग ,कामगारांच्या भवितव्याचा विचार न करता केलेला करार कारवाईस पात्र असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.याचबरोबर अकलूज विभागान्तर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या शासन परिपत्रकाप्रमाणे (क्र 114/दि10-08-2015)होणे गरजेचे असताना देखील कार्यकारी अभियंता यांनी या बदल्या केलेल्या दिसत नाहीत.त्यामुळे याप्रकरनीहि कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.   

                          सदर भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून त्रिस्तरीय कमेटी स्थापन करण्यात आली होती.कमेटिने आपला अहवाल मुदतीत सादर केला व दोषिवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता अकलूज यांना देण्यात आले होते.तरीही अद्याप कारवाई झालेली दिसत नाही.या प्रकरणी 2मे 2017 रोजी बारामती येथील परिमंडल कार्यालयासमोर उपोषण करुन देखील अद्याप कारवाई केली नसल्याने दि22 मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.                   चौकट-शिवरत्नच्या नावाखाली सावळा गोंधळ-शिवरत्न म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण आहे मात्र या भ्रष्टाचारात शिवरत्नचे नाव वापरून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत.मुळात कंपनीच बेकायदेशीर स्थापन करून मोहिते पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक लूट करण्यात आली आहे असे बोलले जात असून कुणी ही कंपनी स्थापन केली त्यांच्यावर कड़क कारवाई करण्याची मागणी होत आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments