मंगळवेढा येथील सचिन कलुबरमे खुन प्रकरणी दोन नगरसेवकासह पंढरीतील एकास अटक!

मंगळवेढा येथील सचिन कलुबरमे खुन प्रकरणी दोन नगरसेवकासह पंढरीतील एकास अटक!


पंढरपूर LIVE 20 मे 2018

मंगळवेढा  येथील सचिन कलुबरमे खून प्रकरणातील फरार आरोपी २ नगरसेवकांसह अन्य एकास गुजरातमधील वलसाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. फेसबुक वरील कमेंटवरुन  झालेल्या भांडणाचा राग मनात धरत शहरातील मुरलीधर चौकात २५ एप्रिल रोजी रात्री पावणे आठ वाजता सचिन ज्ञानेश्वर कलुबरमे याचा बाबा नायकवाडी याने तीक्ष्ण कोयत्याने मानेवर वार करूत खून केला  होता.
यात संशयित आरोपी म्हणून पांडुरंग नायकवाडी आणि प्रशांत यादव या दोन नगरसेवकांची नावे समोर आली होती. घटना घडल्यापासून दोन्ही नगरसेवक फरार झाले होते. तब्बल २५ दिवसांनी गुजरातमधील वलसाड शहरातून शनिवारी ताब्यात घेतले असुन त्यांच्या सोबत शिवराज बाळासाहेब ननवरे ( रा. क्रांती चौक पंढरपूर ) यालाही अटक केले आहे. ननवरे हा नायकवाडीचा नातलग असल्याचे समजते.
रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्याना मंगळवेढ्यात आणण्यात आले आहे. दोन्ही  फरार आरोपी नगरसेवकांना अटक व्हावी म्हणून मृत असलेल्या कलुबर्मे कुटुंबियानी महाराष्ट्र दिनादिवशी पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण केले होते.
या घटनेला आता चार आठवडे उलटले असून जखमी असलेल्या प्रदीप पडवळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले प्रशांत यादव आणि पांडुरंग नायकवाडी हे  दोन नगरसेवक कट रचण्यात सहभागी आहेत. दरम्यान शनिवारी त्या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या शोधार्थ चार पथके नेमण्यात आली होती. विजय कुंभार यांच्या  गुन्हे अन्वेषण पथकास हे यश आले आहे. रविवारी न्यायालयासमोर त्यांना हजर केले जाणार आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments