नगरसेवक संदीप पवार हत्याकांड प्रकरणी आणखी दोन आरोपी गजाआड... दोन्ही आरोपी सुपारी किलर असल्याची चर्चा! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 3 May 2018

नगरसेवक संदीप पवार हत्याकांड प्रकरणी आणखी दोन आरोपी गजाआड... दोन्ही आरोपी सुपारी किलर असल्याची चर्चा!

पंढरपूर LIVE 3 मे 2018

पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार हत्याकांड प्रकरणी आज  पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. दादा उर्फ पिराजी भगवान लगाडे , रा. अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी, पुणे) व दिगंबर संदेश जानराव (रा.लऊळ, ता. कुर्डूवाडी) अशी अटक केलेल्या दोन आरोपचिी नांवे असून सदर आरोपी  हे सुपारी किलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेे. या दोन्ही आरोपींना आज पुण्याच्या मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

संदीप पवार यांची ऐन गुढी पाडव्याच्या दिवशीच भर दिवसा पंढरीतील मध्यवर्ती ठिकाणी गोळया घालून व धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी बबलू उर्फ अक्षय सुरवसे या मुख्य आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली होती. यानंतर दि. 18 एप्रिल रोजी या हत्याकांडाच्या कटातील मुख्य सुत्रधार म्हणून भाजपा जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजीला अटक करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून आजपर्यंत या हत्याकांडात 21 आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अकलुजचे पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण हे करीत आहेत.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com
add