संगम येथे शेतकऱ्यांचे तीव्र रास्तारोको आंदोलन...सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग ; जमिनीचे भूसंपादन व योग्य मोबदला देण्याची मागणी

पंढरपूर LIVE 21 मे 2018


अकलुज-  माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील अकलूज-टेंभुर्णी रोडवरील संगम येथे आज शनिवारी सकाळी १०.४० वाजता  सातारा-लातूर महामार्गावरील जमीन बाधित असलेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जवळ-जवळ एक तासभर रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांच्या वतीने मंडल अधिकारी टी.डी.काकडे यांनी निवेदन स्वीकारले.   सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ सी हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील संगम सरहद्दीपासून माळशिरस तालुक्यातील संगम ते जळभावी अशा १२ गावातील जमिनीतून जात आहे.या रस्त्याच्या कामात शेतकऱ्यांच्या जमिनी,घरे,बोअर,विहिरी,झाडे,पाईपलाईन जात आहेत.तसेच मालमत्ता धारकांच्या मोकळ्या जागा व मालमत्ता जात आहेत.या रस्त्याच्या काम करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीचे कायदेशीररित्या भूसंपादन होवून,योग्य मोबदला मिळावा मगच त्यानंतर रस्त्याचे काम चालू करावे.त्याचप्रमाणे सदर रस्त्याचा डीपीआर बनवणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होवून निलंबन करावे.रस्त्याचे काम करीत असताना बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच काम करावे,यात जमीनचे भूसंपादन करताना अनेक शेतकरी भूमिहीन सुद्धा होत आहेत त्यांना न्याय मिळावा.रस्त्यातून गेलेल्या पाईपलाइनची कायमस्वरूपी व्यवस्था करणेत यावी,रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरे,विहिरी,झाडे,गाय गोटे यांचे मूल्यांकन करून योग्य मोबदला द्यावा,अशा अनेक मागण्यांसाठी विविध ठिकाणी यापूर्वी निवेदने देण्यात आली.

    तसेच शेतकऱ्यांसोबत बांधकाम खात्याचे अधिकारी प्रशांत औटी, पुणे विभाग कार्यकारी अभियंता श्री.पिसोळकर यांचे सोबत अनेक वेळा बैठकाही झाल्या झाल्या.याबाबत या रस्त्याच्या मार्गातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता.परंतु या सर्व बैठका निष्फळ  ठरल्या असून हा महामार्ग होत असताना ठेकेदाराकडून होत असलेली दंडेलशाही हा शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करून आम्हास न्याय द्यावा अश्या अनेक मागण्या आज   संगम येथे झालेल्या रास्ता रोको वेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या.तसेच याबाबतचे निवेदनही देण्यात आले.यावेळी सातारा-लातूर शेतकरी संघर्ष समितीचे महेश इंगळे,नितीनराजे निंबाळकर,गणेश इंगळे,अंकुश मस्के,डॉ.दत्तात्रय सर्जे,ऍड मिलिंद कुलकर्णी,दादासाहेब हुलगे,अजिनाथ कर्णवर,दत्तात्रय मस्के,गणेश कदम,संभाजी इनामदार,शहाजी कदम,बाळासो पंधे,सयाजी पाटील,भारत पाटील,यशवंत ताटे,केशव ताटे,विठ्ठल ताटे,लालासो पराडे,उत्तम भिलारे,विजय पाटील,अशोक पाटील,मधुकर वाघ,अंकुश वाघ,प्रदीप निंबाळकर,दत्ता मस्के,विठ्ठल मस्के,विशाल मस्के,शहाजी मस्के,नागेश मस्के आदी शेकडो शेतकरी यावेळी रास्तारोकोत सहभागी झाले होते.

      यावेळी रास्ता रोकोत तीन-चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उप पोलीस निरीक्षक रवींद्र राठोड व त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 सातारा-लातूर या राष्ट्रीय महामार्गास आमचा विरोध नाही.परंतु या मार्गातील माळशिरस तालुक्यातील जमीन बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीत.म्हसवड ते टेंभुर्णी रस्त्याचे काम पूर्णपणे बंद पाडले आहे.ईथुनपुढे रस्त्याच्या कामाचे कायदेशीर रित्या सर्वे व भूसंपादन करून त्याचा योग्य मोबदला जोपर्यंत सर्व शेतकऱ्याला मिळत नाही तो पर्यंत रस्त्याचे काम चालू होवू देणार नाही.सर्व मागण्या पूर्ण  झाल्या नाहीत आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.-   महेश इंगळे,शेतकरी संघर्ष समिती सदस्य ,संगम.

  या राष्ट्रीय महामार्गावरील माळशिरस ते संगम या पर्यंत २२ गावातील १५०० लोक बाधित आहेत.या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर हा बांधकाम खात्याचे अधिकारी प्रशांत औटी व श्री.पिसोळकर यांनी चुकीच्या पद्धतीने बनवून शासनाची दिशाभूल केली आहे.तेव्हा यांची खातेनिहाय चौकशी होवून संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे.-नितीनराजे निंबाळकर,शेतकरी,गणेशगाव

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments