यु.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेल्या संतोष माळी यांचा स्वेरीत सत्कार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 3 May 2018

यु.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेल्या संतोष माळी यांचा स्वेरीत सत्कार

पंढरपूर LIVE 3 मे 2018


स्वेरीच्या कॅम्पसमधील इंग्रजी संभाषणाचा खूप फायदा झाला.                                                                          
                          -स्वेरीचे माजी विद्यार्थी संतोष माळी

पंढरपूर- ‘मी स्पर्धा परीक्षा देताना स्वेरीमधील शिस्त खूप उपयोगी पडली असून त्याचा मला आज फायदा होत आहे. जर तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळत असेल तर पुढील खडतर वाटचाल सहजरीत्या पार करता येते. त्याचबरोबर सुरवातीला इंग्रजी संभाषणाकडे पाठ फिरवली परंतु प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या भितीपोटी स्वेरी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसमवेत इंग्रजी संभाषण केल्यामुळे खऱ्या अर्थाने माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या पॅनल मधील अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद देवू शकलो.’ असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या यु.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले स्वेरीचे माजी विद्यार्थी संतोष माळी यांनी मिळालेल्या यशाचे गूपित उलघडताना आलेले अनुभव सांगत होते.                   
            


 केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यु.पी.एस.सी मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातून उत्तीर्ण झालेले संतोष विठ्ठल माळी यांनी गुणवत्ता यादीतून ६१२ व्या क्रमांकाणे घवघवीत यश मिळविलेले. स्वेरीमध्ये आज सत्कारासाठी माळी आमंत्रित केले होते. यावेळी माळी हे यशामागील कारणे स्पष्ट करत होते. यावेळी मर्चंट नेव्हीमध्ये आपले स्थान बळकट केलेले स्वेरीचेच माजी विद्यार्थी विश्वनाथ गायकवाड हे देखील स्वेरीतील शिक्षणाचा कसा फायदा झाला हे सांगितले.  प्रारंभी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख डॉ. पी.एस.कचरे यांनी अनुभव सांगताना ‘अभियांत्रिकी मधील सर्व विभागाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत.हे सांगून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच या ठिकाणी पदवी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गापासूनच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जात आहे.’ असे सांगितले. कमी वयातच गोल्ड मेडल मिळविलेले अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती वेळ द्यावा ? ’ याबत बहुमोल मार्गदर्शन केले. मर्चंट नेव्हीमधील अभियंता विश्वनाथ गायकवाड अनुभव सांगताना ‘समुद्रामध्ये असलेल्या जहाजेमध्ये २४ -चोवीस तास काम करावे लागते यासाठी अनेकांची मानसिकता नसते परंतु आमचे भाग्य की स्वेरीमध्ये शिक्षण पूर्ण होण्या अगोदरच आमची न थकता कामे करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे स्वेरीतील शिक्षणाचे महत्व हे त्या ठिकाणी गेल्यानंतरच समजले.एकूणच कोणतीही गोष्ठ नियोजन केल्यास उत्तम निकाल मिळतो. हेच स्वेरीमधील घेतलेल्या शिक्षणातून समजले. विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी कशी जोडली जाईल याची स्वेरीने उत्कृष्ठ पद्धतीने नियोजन करून शिक्षण दिल्यामुळेच स्वेरीतील विद्यार्थी आणि समाज यामध्ये एक अनोखे नाते तयार झाले आहे. आज स्पर्धा परीक्षेत स्वेरीचे विद्यार्थी यश मिळवत आहे. परंतु भविष्यात राज्यातच नव्हे तर देशातील अग्रगण्य महाविद्यालयांशी तुलना केली जाईल असे कार्य प्राचार्य डॉ.रोंगे सरांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरीतील प्राध्यापक वर्गामधून होत आहे. यामुळे स्वेरीत शिक्षण घेतल्याचा सार्थ अभिमान वाटतो.’ पुढे बोलताना माळी म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षेत आपण विचारलेल्या प्रश्नाना कसे स्विकारता आणि कशा प्रकारे सादरीकरण करता? हे महत्वाचे असते. यामुळे ऐनवेळी परिस्थिती कसे नियंत्रणात आणू शकता? हेच ते जाणून घेतात. यावेळी मात्र तुम्ही सावध आणि अल्पावधीत घेत असलेली भूमिका स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे गोंधळून न जाता शांत आणि संयमाने देता येवू शकतात. यासाठी मला डॉ. रोंगे सरांबरोबरच प्राध्यापक वर्ग तसेच दत्ता लांडगे, शिरीष शितोळे या मित्रांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे तबला वादनाचा  छंद होता शेवटी पॅनलमधील अधिकाऱ्यांनी तेथील टेबलावरच तबला वादन करण्यास सांगितले. एकूणच जे कलागुण आहेत तेच सांगितले पाहिजे.यासाठी स्पर्धा परीक्षेला न घाबरता धीरोदत्तपणे सामोरे जा.यश तुमचेच आहे.’ असे आवाहन करून माळी यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कसे असते? याबाबत सविस्तर सांगितले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘आज स्वेरीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होत आहेत हे पाहून मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून यश मिळविल्यानंतर आपला अनुभव माजी विद्यार्थ्यासोबत शेअर केल्यास त्यांनाही स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कसे असते हे समजून येईल.’ यावेळी कौशिक गायकवाड, डॉ. विश्वास मोरे, पाटणे, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी, वसतिगृह अधिक्षक प्रा. एम.एम.पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा, नीता कुलकर्णी यांनी केले तर प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी आभार मानले.महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com
add