अखेर महादेव कोळी समाजाचा एक महत्वाचा प्रश्‍न सुटला... जातीचे दाखले देण्यास सुरुवात..! भाजपाच्या सत्ताकाळात न्याय मिळाला-गणेश अंकुशराव

पंढरपूर LIVE 1  आॅगस्ट  2018


प.महाराष्ट्रातील कोळी महादेव जमातीच्या गेल्या वीस वर्षापासून रखडलेला अनुसुचीत जमातीच्या दाखल्याचा प्रश्‍न  अखेर मार्गी लागला आहे.आषाढी यात्रेपुर्वी महर्षी वाल्मिकी संघाने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांना राज्याचे समाजकल्याणमंत्री ना.दिलीप कांबळे,पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांनी आमंत्रीत केले होते.यावेळी आ.भारत भालके,अदिवासी विभागाचे उपायुक्त श्री गोलाईत,प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ना.दिलीप कांबळे यांनी 
कोळी महादेव जमातीचे दाखले अडवू नयेत असे आदेश प्रांताधिकार्‍यांना दिले होते.या आदेशामुळे कोळी महादेव समाजातील अनेक रखडलेले दाखले मिळण्यास सुरुवात झाली असून यानंतर राहूल जगन्नाथ परचंडे यांना अनुसुचीत जमातीचा दाखला नुकताच प्रदान करण्यात आला आहे.हा आमच्या वीस वर्षाचा लढाईतील महत्वाचा टप्पा असून त्यामुळे आम्ही भाजपा सरकारचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली.
  या बाबत अधिक माहीती देताना गणेश अंकुशराव म्हणाले की, महाराष्ट्रातील कोळी महादेव जमातीच्या बांधवांची गेल्या वीस वर्षापासून दाखल्याबाबत अडवणूक होत होती.योग्य ते पुरावे सादर करुनही केवळ राजकीय हीत जपण्यासाठी कॉगे्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सत्ताकाळात या समाजावर अन्याय करण्यात आला.हजारो युवकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या तर अनेकांच्या नोकर्‍यांवर केव्हा गदा येईल याची शाश्‍वती नव्हती.वेळोवेळी उग्र आंदोलने करुन देखील दखल घेतली जात नव्हती.गतवर्षी ऑक्टोंबर महिन्यात भाजपा सरकाने रक्ताच्या नात्यातील अनुसुचीत जमातीच्या दाखल्यांची पडताळणी करण्याबाबतच्या नियमात महत्वाचे बदल केले होते.त्यामुळे प.महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या दाखला मिळण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.मात्र स्थानिक पातळीवर अडवणूक होत होती.त्यामुळेच आम्ही  या आषाढी यात्रेपुर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र ना.दिलीप कांबळे व ना.विजयकुमार देशमुख यांनी ठोस आदेश दिल्यानेच आमचा प्रश्‍न मार्गी लागला आहे अशी माहीती यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली. 
   यावेळी राहुल परचंडे,संतोष संगीतराव,निलेश माने,संपत सर्जे,रामा कोळी,महेश माने,विशाल माने,सुरज कांबळे,आप्पा करकमकर,औदुंबर परचंडे,विकी अभंगराव,महावीर अभंगराव,जयवंत अभंगराव,अक्षय म्हेत्रे,शैेलेश संगीतराव,प्रशांत गडकर,अंबादास भाळवणकर आदी उपस्थित होते.   
महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments