मनात जाळ लागायला हवा- PSI : निवास शिंदे

पंढरपूर LIVE 1  आॅगस्ट  2018


शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज च्या वतीने , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व सोलापूर विद्यापिठाचा वर्धापन दिन समारंभाचे निम्मीत्ताने महाविद्यालयाचा विद्यार्थी महाराष्ट्रात वैदू समाजात पहिला पीएसआय झालेल्या निवास शिंदे याच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना त्याने मांडले 
कार्यक्रमाची सुरवात सोलापूर विद्यापिठ ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने झाली नंतर प्रतिमापूजन करून मान्यवरांचे सत्कार करणेत आले.
      आपल्या ओघवत्या व रांगडया भाषाशैलीत शिंदे यांने सामान्य विदयार्थी ते अधिकारी असा प्रवास मांडला. प्रचंड कष्ट नेमकेपणाने अभ्यास, व सात्यत्य आणि मनात लागलेला जाळ कोणतेही ध्येय सहजसाध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत झालेले शिक्षण, इंग्रजी भाषेचा गंधही नाही पण जे येत नाही ते सोडून, जे येतेय त्याचावर लक्ष देवून कोणतेही उदि्दष्ट साध्य होवू शकते ते त्यांने मांडले. आईने भिक मागून कसाबसा तग धरलेला संसार केला त्यातुन पुढे झालेला कॅन्सर सारखा आजार, वडिलांचा भंगार गोळा करण्याच्या व्यावसाय रोजच्या जगण्यासांठीचा संघर्ष अशी कितीतरी वाईट परीस्थीती, कदाचीत वाईट हा शब्दही कमी पडावा अशी भयानक परीस्थीतीतून आईला मरताना दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी दिलेला एकांगी स्वताचा लढा हा कौतुकास्पदच आहे. ध्येय निश्चीत केले व २०१६ ची पीएसआयची जाहीरात पाहिली आणि त्यानंतर त्याच कागदावर लिहून ठेवले कि यामधे निवास शिंदे हे नाव अघिकारी म्हणून येणारच त्यातुनच प्रयत्नाला झालेली सुरवात व मिळालेले यश हि मांडणी निवासने खुप सुंदर मांडली कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता कोणतीही ॲकडमी न जाॅईन करता ग्रंथालय न लावता स्वताच्या घरी केलेला दार लावून केलेल्या अभ्यास व मिळालेले यश त्या यशाचे कौतुक शब्दामधे शक्य नाहीये फक्त त्याच्या कष्टाला व जिद्दीला सलाम.          
         कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आबासाहेब देशमुख यांनी अध्यक्षिय भाषणात सहकार महर्षींनी लावलेले या वृक्षाला आज फळे मिळायला लागली आहेत असे विचार व्यक्त करताता ज्या आण्णा भाऊंनी सर्व सामान्य माणूस आपल्या लेखणीतून पेटून ऊठविला त्याचे मुर्त स्वरूप आज निवास सारखी मुले अघिकारी होताना दिसताहेत हि भुमिका मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण पराडे यांनी केले तर आभार डाॅ विश्वनाथ आवड यांनी मांनले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते  
महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments