2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार..? दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 4 September 2018

2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार..? दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..!

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाचे चेअरमन व जिल्ह्याचे आमदार असलेले प्रशांतराव परिचारक, आंबेचिंचोलीच्या माजी सरपंच व विद्यमान जि.प. सदस्या सौ. शैलाताई गोडसे व पहिल्याच निवडणुकित भुमिपुत्र म्हणून अनपेक्षित यश मिळवणारे समाधान आवताडे हे सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत हे सर्वुत आहेच. परंतु यांच्यासोबतच मंगळवेढा तालुक्यातील एक उमदं तरुण सर्वसामान्यातील उद्योन्मुख नेतृत्व नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष महादेव माने हे सुध्दा यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यानुसार 2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक ही पंचरंगी होणार की काय..? याबाबत मतदार संघात तर्कवितर्काला जोरदार उधाण आलेले आढळून येत आहे.   


आमदार भारतनाना भालके यांनी सलग दोनवेळा निवडून येत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी आमदारकीची उमेदवारी फिक्सच केलेली आहे. तसेच सोलापूर जिल्हा विधानपरिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक हे सुध्दा जनतेतून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा आहे. जि.प. सदस्या सौ. शैलाताई गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. तर समाधान आवताडे यांच्याही विधानसभेसाठी उभारण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. परंतु या चर्चेतील चेहर्‍यांसोबतच मंगळवेढा तालुक्याच्या प्रलंबीत प्रश्‍नांबाबत आवाज उठविल्याने अल्पावधित सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष महादेव माने यांनी सुद्धा 2019 च्या निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे स्पष्ट केले आहे.

आता खर्‍या अर्थाने पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा निवडणुकीला रंगत येणार आहे. श्री.भारत भालके यांचा दांडगा अनुभव, श्री. प्रशांत परिचारक यांच जबरदस्त नेटवर्क, सौ. शैलाताई गोडसे यांचा दांडगा जनसंपर्क,श्री. समाधान आवताडे यांची युवा उदयोजक म्हणून असलेली ओळख आणि श्री.संतोष महादेव माने यांना वस्तुस्थिची जाण व युवा वर्गाचा वाढता पाठिंबा  असल्यामुळे 2019 ची विधानसभेची निवडणुक रंगतदार होणार हे मात्र स्पष्ट झाले असल्याची चर्चा गावगावच्या पारावर आणि शहरातील चौका-चौकात ऐकावयास मिळत आहे. परंतु ही निवडणुक वाटते  तेवढी कोणालाच सोपी जाणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत 100% इतिहास घडणार की इतिहासाची पुनरावृत्ती होणार. हा येणारा काळच ठरवेल.
  

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

No comments:

Post a Comment

Pages