समाधानदादा आवताडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले... पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न...

पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018


‘‘पंढरपूर-मंगळवेढा तालुका मतदार संघातून आगामी विधानसभेची निवडणुक लढण्यास सज्ज असुन जनता व कार्यकर्ते ठरवतील त्या पक्षातून किंवा अपक्ष निवडणुक लढविणार’’ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर आणखीही अनेक महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. मागील विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच पंढरपूरकरांसमोर आपले मत व्यक्त करताना नेमके समाधानदादा आवताडे आणखी काय बोलले? यासाठी बघा पंढरपूर लाईव्हचा हा स्पेशल Vedio रिपोर्ट.

 
* कोणत्याही प्रसंगी हाक द्या मी आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी धावुन येईल
* पंढरपूर शहरातील 1000 युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार सोबतच 
अनेक तरुणांना उद्योगासाठी सहकार्य करणार
* जनता व कार्यकर्ते ठरवतील त्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणुक लढविणार
* मंगळवेढ्यापेक्षा पंढरपूर तालुक्यात अनेक समस्या आहेत
* बडवे-उत्पात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविणार
* रिक्षा व टांगा चालकांना सहकार्य करणार
* अक्कलकोटच्या धर्तीवर पंढरीत भव्य अन्नक्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार  
* पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी कटीबध्द पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेस दिले अभिवचन!
  
गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ
विजयादशमी म्हणजेच दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या मागील निवडणुकीत लक्षवेधी ठरलेले नेते व श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.मंगळवेढा चे चेअरमन समाधानदादा आवताडे यांच्या पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी समाधानदादा आवताडे म्हणाले की, ‘‘हे संपर्क कार्यालय पंढरपूर तालुका व शहरातील जनतेशी सुसंवाद साधता यावा. व जनतेचे प्रश्‍न सोडविणे सुलभ जाण्यासाठी सुरु केले असून कोणत्याही प्रसंगी हाक द्या! मी आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी धावुन येईन. तिर्थक्षेत्र पंढरीत एक मोठे अन्न छत्र अक्कलकोटच्या धर्तीवर असावे. याचबोबर पंढरीतील रिक्षा चालक आणि टांगा चालक यांची संख्या मोठी आहे. मात्र हा व्यवसाय करताना या बांधवांना प्रांपंचिक खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे याचसोबत बडवे व उत्पात मंडळींच्या तरुणांसाठीही उद्योग, व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.’’ भक्ती मार्ग, ब्लड बँकेसमोर (अश्‍विनीता गॅस एजन्सी शेजारी) पंढरपूर येथे गुरुवार दि. 18-10-2018 रोजी सायंकाळी ह.भ.प. संजय देहुकर (मोरे) महाराज (जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा विश्‍वस्त) यांच्या शुभहस्ते व समाधानदादा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.  याचवेळी शिवबा काशिद फलकाचे उद्घाटन, दिशा दर्शक फलकाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आदी कार्यक्रमही संपन्न झाले. 

यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे मा. संचालक शेखरभाऊ भोसले, पांडुरंग साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन अप्पासाहेब जाधव, मा.नगराध्यक्ष सुभाषदादा भोसले, समाजकल्याण सभापती जि.प. सोलापूर सौ.शीलाताई शिवशरण अरविंद जाधव, चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष यादव, पद्माकर बागल, सद्गुरु साखर कारखान्याचे संचालक मोहन बागल, सुधाकर फटे, शांतीनाथ बागल, संतोष कवडे, मुन्ना मलपे, हणमंतराव शेळके, दत्ता काळे, प्रकाश पवार, शेळके, जे.के.गायकवाड, नानासाो कांबळे, नाथा देठे, समाजसेवक कृष्णा वाघमारे, डॉ.सुधीर शिनगारे, तुकाराम कुरे, शहाजी साबळे, कृष्णा मासाळ, सिताराम ताड, योगेश वाडेकर, विठ्ठल लवटे महाराज, मोरे सर, संजय अभंगराव, सदा मस्के, सुधाकर गायकवाड, धनु मोरे, स्वागत कदम, दिलीपराव भोसले, विनोदराज लटके, निलेश गंगथडे, अ‍ॅड.अटकळे, अशोक धोत्रे, रवि बंदपट्टे, संतोष मोरे, ज्ञानेश्‍वर मोरे, बबन पाटील, संजय माळी, अमीन मुलाणी, तानाजी जाधव, बालाजी जाधव, दादा घायाळ, प्रकाश मोदी, बालाजी जाधव, महेश चव्हाण, योगेश कांबळे, सचिन पैलवान, दतात्रय कोळेकर, विजय बागल, गणपत मोरे, महामुद मुलाणी, महादेव हिल्लाळ, अहमद मुलाणी, अमोल धोत्रे, मोटे सर आदींसह पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष कवडे, मुन्ना मलपे व समाधानदादा युवा मंचचे पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार मुन्ना मलपे यांनी मानले.  
  महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments