लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा... अन्यथा पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार...! समाधानदादा आवताडे युवा मंचचा इशारा...

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018


पावसाने दडी मारल्याने पंढरपूर तालुका परिसरामध्ये खरीप व रब्बी पिके धोक्यात आली असल्याने शेतकरी वर्ग चिंचातुर अवस्थेत आहे तरी प्रशासनाकडून  लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा.... अन्यथा गुरुवार दि.01/11/2018 रोजी सकाळी 11:00 वाजता अनवली चौक पंढरपूर मंगळवेढा रोड येथे रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा समाधानदादा आवताडे युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे. 
यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना सज्जन श्रीरंग आवताडे यांनी अधिक माहिती दिली. 

या मागणीसंदर्भातील निवेदन नुकतेच पंढरपूर तहसिल कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी सज्जन आवताडे, बालाजी जाधव, संजय पवार, मुन्ना मालापे, विनोद लटके, संतोष कवडे, वैभव ननवरे, अमीन शेख, संजय माळी, सदाआण्णा मस्के, राजाभाऊ पांढरे, संजय घोडके, किसन आसबे, शांतीनाथ बागल, दामाजी शिंगण, प्रकाश पवार, चंद्रकांत जाधव, बालम मुलाणी, भीमराव बनसोडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाधानदादा युवा मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाऊस नसल्याने हुमानीने बर्‍याच शेतकर्‍याचे ऊस पीक धोक्यात आले असून सादर हुमणी बाधित ऊसाच्या क्षेत्राचे पंचनामे त्वरित करावेत व नुकसान भरपाई त्वरित मिळावी.
पाण्याची परिस्तिथी पाहता फळ बागांची पिके धोक्यात आली असून असलेल्या मालाची भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे तरी फळबागांचे पंचनामे त्वरित करावेत व नुकसान भरपाई मिळावी
शेतकर्‍यांचे वीजबिल त्वरित माफ करावेत या सर्व कारणांमुळे शेतकरी बँकेच्या व खाजगी सावकारीतून मुक्त होणे शक्य   नाही म्हणून शेतकर्‍याच्या आत्महत्या वाढत आहेत या सर्व गोष्टीचा विचार करता पंढरपूर तालुक्यामध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करावा व त्याची त्वरित अंमलबजावणी त्वरित व्हावी 
अन्यथा गुरुवार दि.01/11/2018 रोजी सकाळी 11:00 वाजता अनवली चौक पंढरपूर मंगळवेढा रोड येथे रस्तारोको करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. 
हा इशारा समाधान दादा आवताडे युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने तहसील कार्यालय पंढरपूर येथे देण्यात आला

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments