आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सोयीसुविधा व असुविधांबाबत उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल पंढरपूर LIVE चे संपादक भगवान वानखेडे यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान

पंढरपूर LIVE 30 सप्टेंबर  2018


जेष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्या शुभहस्ते पंढरपूर लाईव्ह चे मुख्य  संपादक पत्रकार भगवान वानखेडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार मधुकर भावे,  दै. सकाळचे सोलापूर विभाग मुख्य संपादक अभयजी दिवाणजी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे आदी.

पत्रकारांच्या पाठी समाजाची देखिल कौतुकांची थाप हवी : मधुकर भावे 
        समाजासाठी झटणा-या पत्रकारांच्या पाठींवर पत्रकारांच्या बरोबरीनेच समाजाची देखील कौतुकाची थाप हवी. याकरिंता पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेचे अंग जोपासले पाहिजे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आषाढी यात्रेत सर्वोत्कृष्ट वार्ताकन केलेल्या  पत्रकारांना आज पुरस्कार देण्यात आले. यावेळी  ते बोलत होते. 
पंढरपूर LIVE चे संपादक भगवान गणपतराव वानखेडे यांना यावेळी आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सोयीसुविधा व असुविधांबाबत उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पंढरपूर लाईव्ह हे पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूजवेब चॅनल असून पंढरपूर लाईव्ह ची वाचकसंख्या आज घडीला 30 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान गणपतराव वानखेडे व उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांच्या प्रयत्नातून लवकरच पंढरपूर लाईव्हवर वाचकांसाठी अत्याधुनिक व जलद सुविधा उपलब्ध होणार आहेत.  पंढरपूर लाईव्ह वरील जाहिरातीही अधिक आकर्षक व परिणामकारक ठरतील जेणेकरून पंढरपूर लाईव्ह च्या जाहिरातदार बंधु-भगिणींना याचा अधिक फायदा होईल. हा पुरस्कार देऊन श्रमीक पत्रकार संघाने पंढरपूर लाईव्ह च्या सन्मानात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे. याबद्दल संपादक व उपसंपादक यांनी श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलभाऊ उंबरे व संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले.

          यावेळी पंढरपूरातील विविध दैनिक , न्यूज चॅनल तसेच ई-न्युज  वेब पोर्टलच्या प्रतिनिधींचा देखील  सन्मान करण्यात आला. यामधे आषाढी यात्रेतील व्यक्तीगत पुरस्कारामधे दै. तरूण भारत संवादचे पंढरपूर कार्यालयातील वार्ताहर संतोष रणदिवे यांना सन्मानीत करण्यात आले. याबरोबरीेने येथील पत्रकार प्रविण नागणे , प्रभू पुजारी ,  समाधान गायकवाड , बजरंग नागणे , विजय कुलकर्णी , माउली डांगे यांना सन्मानीत करण्यात आले. तर न्यूज चॅनेल विभागातून रवि लव्हेकर , तर वेब पोर्टल विभागातून  आणि भगवान वानखेडे  व अभिराज उबाळे यांना सन्मानीत करण्यात आले आहे. 

    याप्रसंगी पुढे बोलताना मधुकर भावे म्हणाले , पंढरपूर ही समतेची नगरी आहे. येथील पत्रकार प्रतिवर्षी आषाढी यात्रेला १५ लाख भाविकांची सेवा करीत असतात. त्यामुळे  येथील पत्रकार हे एका वेगळ्या उंचीवरील असतात असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. 

            तसेच याप्रसंगी राजेंद  हुंजे यांनी पत्रकारीता ही शोधाची जननी असल्यांचे सांगत पत्रकारीतेचे मर्म सांगण्याचा प्रयत्न केला. यामधे पंढरपूरातील आजपर्यतच्या अनेक बातम्यांच्या आठवणी सांगितल्या व आषाढी यात्रेतील बातम्यांबाबत मार्गदर्शन केले.   

अत्यंत नेटक्या आणि शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले. यावेळी  पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.   महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments