माळशिरस तालुक्यातील बागेवाडी बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे... हाताने ओरखडले तरी निघतात सिमेंटचे ढलपे..!! पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता वाघमारे यांची तक्रार...

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018अकलूज:-(वार्ताहर)- आपणाकडे दत्तक म्हणून असलेल्या बागेवाडीतील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या बंधार्‍याचे काम हे सर्व नियम अटी डावलून केवळ 10/12 दिवसातच पूर्ण केले असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार पंचायत समिती सदस्या सौ.प्राजक्ता वाघमारे यांनी केली आहे.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हे गाव आपण जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दत्तक घेतले आहे.बागेवाडी गावातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झालेले आहे.याच ओढ्यावर पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे उपअभियंता कार्यालयामार्फत 30 मी.लांबीचा बंधारा मंजूर झाला.हा बंधारा 15 लाख 3 हजार 196 एवढ्या रकमेचा आहे.तो मागील दोन महिन्यात बांधून पूर्ण झालेला आहे.मात्र या कामात कोणत्याही शर्ती व अटींची पूर्तता झालेली नसून या कामात अत्यंत कमी सिमेंट तसेच वाळू ऐवजी त्याच ओढ्यातील माती मिश्रित वाळू वापरली आहे.तसेच कमी प्रमाणात स्टील,खडीडस्ट भुकटी वापरून केवळ 12/15 दिवसात पूर्ण केला व त्याची रक्कमही संबंधित ठेकेदाराने उचलली आहे.दोनच महिन्यात या कामाचे सिमेंटचे ढलपे हाताने निघत आहेत.

या बंधार्‍यामुळे संपूर्ण बागेवाडी गावाला धोका निर्माण होणार आहे.त्यामुळे या ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे व संबंधित अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दि.17 डिसेंम्बर रोजी माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.


    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments