लोकसभा निवडणुक 2019 व यवतमाळ पोलीस विभागातील अधिकारी यांच्या बदल्यातील अनियमता वाद्याच्या भोव-यात - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 22 February 2019

लोकसभा निवडणुक 2019 व यवतमाळ पोलीस विभागातील अधिकारी यांच्या बदल्यातील अनियमता वाद्याच्या भोव-यात

Pandharpur LIVE 21 February 2019निवडणूक आयोग व मुख्यमंञ्यांना दगडे आव्हान..

यवतमाळ :-  निवडणुक आयोग भारत सरकार यांनी लोकसभा निवडणुक 2019 ही निपष्य पातीपणे व स्वच्छ वातावरणात होण्यासाठी सर्व विभांगाना परिपत्रक काढुण आदेषित केले व ठरावीक मुदतीत आचार सहीता लागण्या अगोदर सर्व बदली पात्र अधिकार्याच्या बदल्या लोकसभा निवडणुक  2009 व 2014 च्या कठोर निकशाचे पालन करून करण्यात याव्यात असे आदेष 
केले. सदर परिपत्रकाचा सार बघीतला असता प्रत्येक अधिकारी हा त्या जिल्हयात किंवा लोकसभा मतदार संघात तिन वर्षापेक्षा जास्त काळा करीता कार्यकारी 
पदावर नेमणुकीस असलेले सर्व अधिकारी तसेच त्यांचा प्रत्यक्ष निवडणुक कामकाजाशी संबध येत असलेले अशा सर्वाच्या बदल्या करण्यात येणे अपेक्षित होते. 
तसेच निवडणुक कामकाजाशी संबध असणारे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन यांना सुध्दा एकाच लोकसभा मतदार संघातुन तसेच जिल्हयातुन दुसर्या जिल्हयात बदलविणे अपेक्षित होते जेणे करून येणारी निवडणुक हया पारदर्षक वातावरणात पार पाडणे निवडणुक आयोगाला शक्य झाले असते .

परंतु यात पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र यांनी या आगोदर लोकसभा निवडणुक 2009 आणि 2014 मध्ये वापरलेले निकश हे हेतु पुरस्पर दुर्लक्षीत करून सताधारी पक्षाला फायदा व्हावा व तिन चार 
वर्षापासुन एकाच लोकसभा मतदार संघात नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिर्याला हाताषी घेउन सताधारी पक्षाला त्याचा फायदा घेता यावा या हेतुने लोकसभा निवडणुक 2019 पुर्वी करण्यात आलेल्या बदलीच्या 
परिपत्रकात वारंवार बदल करून स्वताः बदलीचे निकश ठरवुण सताधारी पक्षांना आपल्या मर्जितील पक्षाषी निश्ठावंत अधिकारी हे त्याच क्षेत्रात निवडणुकी दरम्यान कार्यरत राहतील अशा प्रकारचे या आगोदर कधिही अवंलबुन नसलेले बदली धोरण लागु करण्यात आले. जेव्हा पुढील दोन महीण्याच्या अवधितच सर्वसाधारण बदलीचा कालावधी असुन या आगोदर जेव्हा - जेव्हा लोकसभा / विधानसभा निवडणुका पारपडल्या त्या वर्षातील सर्वसाधारण बदल्या निवडणुक पुर्वीच्या बदल्यातच करण्यात आल्या आहे. 
सदर बदली धोरणामुळे पुढील होणारे निवडणुका हया 
निपक्षपाती होतील काय??
 असा प्रश्न विरोधी पक्ष तसेच यवतमाळ जिल्हातील जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


No comments:

Post a Comment

Pages