आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (3), कलम 37 (1) लागू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 13 February 2019

आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (3), कलम 37 (1) लागू

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019

आयुक्तालयाच्या हद्दीत
कलम 37 (3) लागू
सोलापूर,दि. 13 :- पोलीस आयुक्तालयाच्याहद्दीत सभा घेतले जाण्याची वा मिरवणुका काढली जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये लागू केले आहेत. हे आदेश 14  ते 28 फेब्रुवारी 2019  पर्यंत लागू राहतील.
या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास, पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे, सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असल्यास लागू राहणार नाही.
000000


आयुक्तालयाच्या हद्दीत
कलम 37 (1) लागू
सोलापूर दि.13 :- सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये आदेश लागू केले आहेत. हा आदेश 14  ते 28फेब्रुवारी 2019  पर्यंत लागू राहील.
            

आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर नितीविरूध्द निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होवून अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे यास मनाई करण्यात आली आहे.
            सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्रधिकरणाची परवानगी घेतली आहे.अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत, असेही  आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

add