शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती आणि शहीद जवानांना श्रद्धांजली

Pandharpur LIVE 22 February 2019


शहीद जवान रमेश देवकर यांच्या कुटुंबियांना दिली आर्थिक मदत
पंढरपूर । प्रतिनिधी,
क्रांति चौक, गोविंदपुरा येथील शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहीद जवान रमेश देवकर यांच्या कुटुंबियांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
याप्रसंगी 2006 साली शहीद झालेले सीआरपीएफ जवान रमेश ज्ञानेश्वर देवकर यांच्या कुटुंबियांना प्रतिष्ठानच्या वतीने रोख 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली. शहीद जवान  रमेश देवकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या कुटुंबाला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 
देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांसाठी सर्व व्यापारी, उद्योजक, नागरिक यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचा हात द्यावा हा संदेश या माध्यमातून प्रतिष्ठानने दिला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद (भैय्या) देशमुख, नगरसेवक विक्रम शिरसट, प्रकाश (बुवा) अभंगराव, पैलवान माऊली काळे, अनिकेत कदम, लखन आदमिले, विशाल कोताळकर, श्रीकांत भिसे, शुभम तारे, अक्षय गायकवाड, प्रशांत शेटे, करण बेताळे, रोहित रजपुत, सारंग तारापूरकर आदी उपस्थित होते.