मंगळवारी पंढरपूरकर अर्पण करणार वीर जवांनांना श्रध्दांजली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 16 February 2019

मंगळवारी पंढरपूरकर अर्पण करणार वीर जवांनांना श्रध्दांजली

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


समस्त पंढरपूरकरांच्या वतीने हनुमानपेठ (वजिराबाद चौक) येथे अवंतीपूरच्या दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर येथे दंडावर काळ्या फिती बांधुन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.
पुलवामाकडे निघालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. शहीदांच्या वीर मरणामुळे सबंध देश शोकसागरात बुडालेला आहे.  

या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी व जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंढरपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन धिरज म्हमाने, ओंकार बसवंती, अनिरुध्द बडवे (संपादक दै. पंढरी संचार) व  भगवान वानखेडे (संपादक दै. पंढरपूर लाईव्ह) यांनी केले आहे.महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

add