पंढरपूर नगरपरिषद व योग विद्याधाम च्या संयुक्त विद्यमाने पंढरीत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा. - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 13 February 2019

पंढरपूर नगरपरिषद व योग विद्याधाम च्या संयुक्त विद्यमाने पंढरीत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा.

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019

                पंढरपूर नगरपरिषद व योगविद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सावरकर वाचनालय येथे मंगळवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा योगतज्ञ व योग शिक्षक श्री अशोकजी ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सामुदायिक 51 सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला व सकाळी 6.30 वा योगभवन येथे योग शिक्षक श्री सुनील वाळूजकरश्री प्रशांत आगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली 51 सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला तसेच नगरसेवक विवेक परदेशी यांच्या नियोजनाने पंढरपुर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.योगतज्ञ श्री.अशोक ननवरे यांनी सुर्यनमस्काराचे अचूक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.


कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष श्री नागेशजी भोसले  यांच्या शुभहस्ते व उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक विवेक परदेशी,पं.न.प.नूतन नियुक्त सह.मालमत्ता पर्यवेक्षक प्रियांका पाटील,नूतन उपलेखापरिक्षक अभिलाषा नेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाले. या प्रसंगी  बोलताना उपमुख्याधिकारी श्री सुनील वाळूजकर यांनी सांगितले कीआज संपूर्ण भारतात तसेच जगभरात सूर्यनमस्कारयोग साधनेचे महत्व लक्षात घेवुन नागरिकांमध्ये योगाचे महत्व लक्षात यावे म्हणुन हे सूर्यनमस्काराचे अभियान राबविण्यात येत आहे तसेच नागेशजी भोसले यांनी सांगीतले की दररोज योग साधना केल्यास मानवाचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते त्यामुळे नियमितपणे सर्वांनी योग साधनासूर्यनमस्कार करावेत असे अवाहन त्यांनी केले,उपलेखापरिक्षक अभिलाषा नेरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्य देवाचे व सूर्यनमस्काराचे महत्व गोष्टी रूपाने समजावून सांगितले.


यावेळी बोलताना नगरसेवक  श्री विवेक परदेशी यांनी सर्वांचे स्वागत करुन योगाच्या आजच्या या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली व त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यायामाची आवड लागली तर ती आयुष्यभर टिकते व शरीर निरोगी राहतेखेळ व व्यायामामुळे आरोग्य सुधारते असे सांगितले. प्रकल्प संचालक योग विद्या धामचे प्रमुख श्री अशोक ननवरे सर यांनी सुर्य नमस्काराचे महत्व सांगुन सुर्य नमस्काराचा इतिहास व संशोधनात्मक माहिती सांगितली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व अभ्यासाकरिता ओंकारध्यान तसेच सूर्यनमस्काराने स्मरण शक्तीएकाग्रताग्रहण शक्तीआकलन शक्ती व सहन शक्ती वाढते असे सांगितले. श्री गोवर्धन भट्टड यांनी आदर्श प्रात्यक्षिके दाखविली व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सामुदायिक सूर्यनमस्कार सुलभरित्या घातलेकार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
       

मुख्याध्यापक श्री डिंगरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केलीसूत्रसंचालन श्री पठाण सर यांनी केले तर आभार पवार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगशिक्षक शाहुराजे जाधवश्री सुनील यरगट्टीकरश्री अभय आराध्येतसेच सर्व शिक्षकशिक्षिका ,सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

add