स्वेरीच्या ‘ट्रेडएक्स्पो २०१९’ चे आज टिळक स्मारक मैदानावर उदघाटन

Pandharpur LIVE 22 February 2019
 ‘ग्राहक व कृषी’ मेळाव्यात होणार लाखोंची उलाढाल
पंढरपूर- आतुरतेने वाट पाहत असलेल्या स्वेरीच्या ट्रेडएक्स्पो २०१९ हा ग्राहकांसाठी असलेल्या मेळाव्याचे आज  शनिवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. स्टेशन रोडलगत असलेल्या टिळक स्मारक मैदानावर उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम आलेले व नूतन उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर अँड डेव्हलपर्स चे शार्दुल नलबिलवार व तिरुपती डिलाईटचे सागर कौलवार व अर्जुन बसटवार यांच्या हस्ते उदघाटन होणार असून यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

 ट्रेडएक्स्पो २०१९ मध्ये विविध कंपन्यांनी आपले प्रोडक्ट विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले असून दि.२३, २४ व २५ फेब्रुवारी २०१९ या तीन दिवशी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत ट्रेडएक्स्पो २०१९’ च्या ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. याची तयारी गेल्या महिनाभरापासून या भव्यकृषी व ग्राहक मेळाव्याची युद्ध पातळीवर तयारी सुरु होती. आजपासून (शनिवार) ग्राहकांसाठी सज्ज झाल्याने या मेळाव्यात साधारण तीन दिवसात लाखोंची उलाढाल होईल असा अंदाज मार्केट तज्ञांकडून वर्तविला जात आहे. एम.बी.ए. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक बाजारपेठेपासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंतचे सखोल ज्ञान तसेच, कार्पोरेट उद्योगांना लागणारे मनुष्यबळ, उद्योग सुरु करण्यासाठी व पुढे यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा यांचे सखोल ज्ञान मिळविण्याच्या उदात्त हेतूने ट्रेडएक्स्पो २०१९’ च्या माध्यमातून कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन स्वेरी संचलित एम.बी.ए. विभागाने केले असून विक्रेते व ग्राहक यांच्याशी सुसंवाद होवून यातून व्यवहार होतील. टिळक स्मारक मैदानात वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने असलेल्या ६५ कंपन्या आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ‘ट्रेड एक्स्पो२०१९’ मध्ये सहभाग घेतला असून हा मेळावा म्हणजे सोलापूर जिल्यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी असून ग्राहकांना कमी दरात वस्तू खरेदी करता येणार आहे. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com  या मेळाव्यामध्ये एकाच मांडवाखाली सर्व वस्तू मिळणार आहेत. यापूर्वी ‘ट्रेड एक्स्पो’ हा ग्राहकांसाठीचा मेळावा गोपाळपुरच्या माळरानावर अर्थात महाविद्यालयाच्या प्रांगणातच घेण्यात येत होता पण ग्राहक व विक्रेते यांना वाहतुकीसाठी पंढरपूर शहरापासून जवळपास चार किलोमीटर अंतर पायपीट करावे लागत होते. यासाठी हा मेळावा पंढरपूर शहरात भरविण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्याकडे आग्रही भूमिका घेतली. गेल्या वर्षी टिळक स्मारक मैदानात हा ग्राहक मेळावा आयोजित केला होता.त्या तीन दिवसात जवळपास पंढरपूर शहराबरोबरच शेजारच्या जिल्ह्यातील नागरिकांनी देखील याचा लाभ घेतला होता. याच पार्श्वभूमीवर यंदादेखील याच ठिकाणी ‘ट्रेड एक्स्पो २०१९’.मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार आज (शनिवार) पासून तीन दिवस हा ग्राहक मेळाव्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये आकर्षक व सवलतीच्या दरात शेतीविषयक अवजारे व उत्पादने, टू व्हीलरफोर व्हीलरइलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू व साहित्यरेडीमेड कपडेट्रॅक्टरठिबक सिंचनविमा योजनागृहोपयोगी वस्तू, पुस्तकेमोबाईल व त्याचे साहित्य तसेच इतर गरजेचे साहित्य याट्रेडएक्स्पो २०१९’ प्रदर्शन व विक्री योजनेत असणार आहेत. सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेडएक्स्पो २०१९’ या उपक्रमाचे आयोजन स्वेरी संचलित एम.बी.ए विभागाने केले असून एम.बी.ए विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील व इतर प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी समन्वयक संकेत हळणवर व वैभव साळुंखे यांच्यासह एम.बी.ए. विभागातील सर्व विद्यार्थी ट्रेडएक्स्पो २०१९च्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या आयोजनामुळे पंढरपूरकरांना खरेदी करण्यासाठी एक मेजवानीच मिळणार आहे.