पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 15 February 2019

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2019


जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. राहुल करांडे हे विठुरायाची वाडी गावचे आहेत. सांगली जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. सीआरपीएफकडून शहीद जवानांबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सांगली जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.


गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात 39 जवान शहीद झाले आहेत. तर इतर अनेक जवान जखमी झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004नंतर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

No comments:

Post a Comment

Pages