शिवजयंती निमित्त पंढरपुरात प्रथमच महिला व युवतींचे लेझीम ढोल पथक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 21 February 2019

शिवजयंती निमित्त पंढरपुरात प्रथमच महिला व युवतींचे लेझीम ढोल पथक

Pandharpur LIVE 21 February 2019


पंढरपूर । प्रतिनिधी,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे प्रथमच हरिनयन पार्क इसबावी येथील एकता महिला मंडळाने महिला व युवतींचे लेझीम व ढोल पथक तयार करून पंढरपूरकरांची मन जिंकली आणि छत्रपती शिवरायांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. सदरची मिरवणूक ही इसबावी - सावरकर चौक या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आली.


हरिनयन पार्कमधील या महिला मंडळाने मिरवणूकीतून लेझीम, ढाल, लाठी- काठी याचे प्रात्यक्षिक सादर केले. या मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे या मिरवणूकीमध्ये फक्त महिला व युवती सामील होत्या. शिवरायांना अभिप्रेत असलेला राष्ट्रधर्म प्रत्येक महिला व युवतीच्या मनात जागृत करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
या मैदानी पारंपारिक खेळातून महिला व युवतींमध्ये सांघिक भावना व क्षात्रधर्म वाढविणे जेणे करून महिलांचे आत्मबल वाढेल त्या निर्भय बनतील व रोजच्या जीवनात त्यांना ज्या सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचा सामना त्या आत्मविश्वासाने करतील हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केला.
या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार भारतनाना भालके हे स्वत: उपस्थित राहिले व महिलांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच या कार्यक्रमास समाधान दादा आवताडे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या तर शैलाताई गोडसे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच पंढरपूर शहराचे उपनगराध्यक्ष विशाल मलपे, गणेश अधटराव व मुन्ना मलपे यांनी ही या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. पंढरपूरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या उपक्रमास भरभरून दाद दिली. या उपक्रमाच्या आयोजिका डॉ.सौ.वृषाली पाटील, सौ.संगीता पाटील, सौ.सोनाली साबळे, मिनाक्षी साळसकर, गीता घोडके व त्यांच्यासह सर्व महिला व युवती सहकाऱ्यांनी सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्व उपक्रमाचे शिवभक्त मंडळ व पंढरपूर शहरातील नागरिकांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Pages