पंढरपूर तालुक्यामध्ये आमदार भारत भालके यांचा गांवभेट दौरा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 21 February 2019

पंढरपूर तालुक्यामध्ये आमदार भारत भालके यांचा गांवभेट दौरा

Pandharpur LIVE 21 February 2019


            पंढरपूर दि.20 ः पंढरपूर तालुक्यामध्ये सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती असून जनावरांच्या चार्‍याचे व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने येणारा काळ कसा पार पाडायचा या विवंचनेत बळीराजा आहे. या दुष्काळावर मात करणेसाठी पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी व प्रशासनाच्या सर्व खात्याचे विभाग प्रमुख अधिकार्‍यांसमवेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारतनाना भालके यांनी पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या अडी-अडचणी समजावून घेण्यासाठी पंढरपूर तालुका गांवभेट दौरा केलेला आहे. 
आमदार श्री भालके यांनी सदर गांवभेट दौर्‍याचा पहिला टप्पा गुरूवार दि.14.02.2019 रोजी  रांझणी, शिरगांव, तरटगांव, सिध्देवाडी, चिचुंबे, एकलासपूर, तावशी, तनाळी, तप.शेटफळ, खर्डी, उंबरगांव व कोर्टी आदी गावांचा गांवभेट दौरा केला. तसेच गांवभेट दौर्‍याचा दूसरा टप्पा आज बुधवार दि.20.02.2019 रोजी पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी, गोपाळपूर, अनवली, कासेगांव, लक्ष्मी टाकळी, बोहाळी, गादेगांव, वाखरी, कौठाळी व शिरढोण या गांवांचा गांवभेट दौरा आयोजित करून ग्रामस्थांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
यावेळी आमदार श्री भालके यांनी प्रत्येक गांवात झालेल्या गांवभेट दौरा बैठकीचे इतिवृत्त बनवून संबंधित अधिकारी व खात्याला समस्या व अडी-अडचणी सोडविण्यासंदर्भात पत्रे पाठवावीत अशा सूचना केल्या. तसेच गांवातील व वाडी-वस्तीवरील शेतकर्‍यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना पिण्याचे पाणी व चारा छावण्या उपलब्ध करणेसाठीचे प्रस्ताव संबंधित अधिकार्‍यांना त्वरीत तयार करून पाठविण्यात यावेत व ग्रामस्थांच्या अडी-अडचणीबाबत ज्या-त्या खात्यांच्या अधिकार्‍यांना सोडविणेसाठी योग्य त्या उपाय-योजना करण्याविषयी सूचना आमदार श्री भालके यांनी अधिकार्‍यांना दिल्या. तसेच शेतकर्‍यांच्या शेती पंपाच्या वीज पुरवठ्याच्या अडी-अडचणी निवारण करण्याबाबत आमदार श्री भालके यांनी एम.एस.ई.बी.च्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तालुक्यातील रस्त्यावरील झाडे-झुडपे काढून रस्ते दुरूस्त करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे कॅनॉलमधील झाडे-झुडपे काढणे, कॅनॉलच्या साईटपट्टया दुरूस्त करणे अशा प्रकारच्या शेतकर्‍यांच्या समस्या दूर करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करणेकामी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच सध्या चालू असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करणेसाठी शासनाने त्वरीत योग्य त्या उपाय-योजना करणेकामी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. 
            सदर गांवभेट दौर्‍याप्रसंगी त्या-त्या गांवातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदर दौर्‍यामध्ये पंढरपूरचे मा.उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचेसह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages