सिंहगड मध्ये "रिसेंट टेड्रस इन आयटी" या विषयावर मार्गदर्शन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 16 February 2019

सिंहगड मध्ये "रिसेंट टेड्रस इन आयटी" या विषयावर मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 16  फेब्रुवारी 2019


पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील संगणक विभागात "रिसेंट टेड्रस इन आयटी" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेसंगणक विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे,  प्रा. सोमनाथ ठिगळे प्रा. दीपक बडगुजर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. दीपक बडगुजर  यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. बडगुकर म्हणाले,इंनाफाउर मेशन टेक्नॉलॉजी मध्ये रोज नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली येत आहे. त्यामुळे द्वितीय व  तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी रिसेंट ट्रेडर्स इन आयटी क्षेत्रातील माहितीचे ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंगइंटरनेट ऑफ थिंग्ज व इंडस्ट्रीसाठी काय काय शिकावे लागेल व छोटे-छोटे प्रोजेक्ट कसे करता येतील. यावर अतिशय चांगली माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली.नोकरीच्या मागे न लागता उद्योजक कसे बनावे अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

add