रामचंद्र सरवदे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित. - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 February 2019

रामचंद्र सरवदे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

Pandharpur LIVE 20 February 2019

         
         
पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक ठिणगीचे संपादक रामचंद्र सरवदे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार सोलापूर येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमात देण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपत्र येऊन रामचंद्र सरवदे यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी श्री सदगुरू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर, तसेच प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आणि महिला पत्रकार विजयश्री गुळवे उपस्थित होत्या.
             
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरी करणार्‍या पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार  दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.सोलापूर येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक  मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
          या समारंभाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्या मधील शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
           पंढरपूर येथील साप्ताहिक ठिणगीचे  संपादक  रामचंद्र सरवदे ज्येष्ठ पत्रकार  आहेत.  त्यांना आदर्श  पत्रकार पुरस्काराने  सन्मानित करण्यात आल्याने  पंढरपूर येथील  पत्रकारिता  क्षेत्रात त्यांचे  कौतुक करण्यात येत आहे. पत्रकार रामचंद्र सरवदे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील  योगदान मोठे असून सुमारे वीस वर्षापासून या क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत. साप्ताहिक ठिणगी च्या माध्यमातून त्यांनी समाजात आणि जनमानसात आपली आदर्श पत्रकारितेची छबी निर्माण केली आहे.

add