स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९वी जयंती साजरी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 February 2019

स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९वी जयंती साजरी

Pandharpur LIVE 18 February 2019


शिवरायांच्या नेतृत्व आणि कार्तुत्वांमुळे २७२ देशात ‘शिवजयंती’ साजरी केली जाते
-अधिष्ठाता प्रा. राजकुमार कदम
पंढरपूर- ‘सामान्य जनतेला स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित करणारे राजा शिवछत्रपती यांना हिंदवी स्वराज्याची भूक होती त्यामुळे रयतेला नेमके काय हवे याची त्यांना जाण होती. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना ‘संस्कार आणि संस्कृती’ची शिकवण दिल्यामुळेच शिवरायांचे नेतृत्व आणि कर्तुत्व याचा विश्वात आदर केला जातो. त्यामुळे आज विश्वातील २७२ देशात शिवजयंती साजरी केली जाते.’ असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानचे अधिष्ठाता प्रा. राजकुमार कदम  यांनी केले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या मध्यवर्ती अॅम्पी थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठानचे प्रा. राजकुमार कदम उपस्थित शिवप्रेमींसमोर शिवचरित्र उलगडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी परिवहन मंत्री सुधाकरपंत परिचारक होते.


भ्याड हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात झाली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या वाटचालीची माहिती दिली. ‘मेसा’ अंतर्गत क्षितीज        २ के१९ या राज्यस्तरीय  तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन केले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार परिचारक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन येथील संस्कृती व संस्काराचे अनुकरण करावे तितके थोडेच आहे.’ असे सांगितले. पुढे बोलताना प्रा. कदम म्हणाले ‘ मी याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलो नसून शिकण्यासाठीच आलो आहे. मी आजपर्यंत अनेक महाविद्यालयात गेलो परंतु येथील शिस्त व संस्कृती कोठेही आढळून आली नांही. असे सांगून आज व्हिएतनाममध्ये देखील राजा शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख कशी आहे याचे उदाहरण देवून महाराजांचे विचारशीलकृतीशिल नेतृत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकून ‘छत्रपती शिवाजी महाराजांमधील नेतृत्व गुण अंगीकारणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाल काका म्हणाले की, ‘स्वराज्यासाठी केलेल्या योगदानामुळे आणि त्यागामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन विश्वात केले जाते. ते सर्व गुण संपन्न होते त्यांच्या शूर, धाडसी, साहसी, संयमी, दातृत्व अशा अनेक गुणांमुळे त्यांचे विश्वातील प्रत्तेकाच्या हृदयात स्थान निर्माण झाले.’  असे सांगून शिवरायांचे नेतृत्व आणि त्यांची न्यायव्यवस्था’ यावर प्रकाश टाकला. भाषणापूर्वी प्रचंड जयघोष आणि जल्लोष करणारे विद्यार्थी नंतर मात्र पाहुणे सांगत असलेले शिवचरित्र शांतपणे व गंभीरतेने ऐकत होते. त्यांची ही संयंमी भुमिका पाहून विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे प्रा. कदम यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

 संपूर्ण कॅम्पसमध्ये विद्यार्थी ‘जय भवानी, जय शिवाजी ! जय जिजाऊ ! जय शिवराय!अशा विविध घोषणांनी कॉलेज कॅम्पस दणाणत होता, तर शिवमूर्तींच्या पालखीने विशेष लक्ष वेधून घेतले.इंजिनिअरिंगच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यमुर्ती व त्यासमोर विद्यार्थींनींनी काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होते. एकुणच संपुर्ण कॅम्पस शिवमय बनले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे, संस्थेचे विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विद्यार्थी सचिव अक्षयकुमार कोरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, सर्व  अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. सुत्रसंचालन विद्यार्थी व प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.  

add